मुंबईत 18 ते 44 वर्षे या वयोगटाला Free Vaccine नाही, जाणून घ्या कारण

मुंबई तक

• 02:58 PM • 27 Apr 2021

मुंबईसह महाराष्ट्रात 1 मेपासून 18 ते 44 या वयोगटासाठी लसीकरण सुरू होतं आहे. मुंबई महापालिकेने या पार्श्वभूमीवर 227 वॉर्ड्समध्ये प्रत्येकी एक लसीकरण केंद्र उभारण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईतली 63 केंद्रं ही राज्य सरकार आणि मुंबई महापालिका यांच्यातर्फे चालवली जाणार आहेत. या केंद्रांवर 45 वर्षे आणि त्यावरील वयोगटालाच लस मिळणार आहे. 18 ते 44 या वयोगटाने […]

mumbaitak

mumbaitak

follow google news

मुंबईसह महाराष्ट्रात 1 मेपासून 18 ते 44 या वयोगटासाठी लसीकरण सुरू होतं आहे. मुंबई महापालिकेने या पार्श्वभूमीवर 227 वॉर्ड्समध्ये प्रत्येकी एक लसीकरण केंद्र उभारण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईतली 63 केंद्रं ही राज्य सरकार आणि मुंबई महापालिका यांच्यातर्फे चालवली जाणार आहेत. या केंद्रांवर 45 वर्षे आणि त्यावरील वयोगटालाच लस मिळणार आहे. 18 ते 44 या वयोगटाने खासगी रूग्णालयात लस घ्यावी हे मुंबई महापालिकेचे आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी म्हटलं आहे. त्यामुळे मुंबईत या वयोगटाला फ्री व्हॅक्सिन मिळणार नाही हे निश्चित आहे.

हे वाचलं का?

18 ते 44 या वयोगटाने खासगी रूग्णालयात लस घ्यावी

इकबाल सिंह चहल, आयुक्त, मुंबई महापालिका

काय म्हटलं आहे मुंबई महापालिकेचे आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी?

मुंबईत 18 ते 45 या वयोगटाचे अंदाजे 90 लाख नागरिक आहे. या सगळ्यांसाठी प्रत्येकी दोन डोस म्हणजे 1 कोटी 80 लाख डोस द्यावे लागणार आहेत. या मोहिमेची व्यापकता पाहता, लस साठ्याची पुरेशी उपलब्धता, खरेदी, वाहतूक, वितरण त्यासोबत लसीकरण केंद्रांची संख्या वाढवणे हे कळीचे मुद्दे आहेत.

मुंबईतील सर्व खासगी रुग्णालयातील लसीकरण केंद्रांमध्येच नोंदणीकृत 18 ते 45 वर्ष वयोगटातील नागरिकांना लस देण्यात येईल, असा महत्त्वपूर्ण निर्णय बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी जाहीर केला आहे.

‘ही’ आहेत कोव्हिड संवदेनशील राज्यं, महाराष्ट्र सरकारने केली यादी जाहीर

मुंबईतील सर्व 227 प्रभागांमध्ये प्रत्येकी 1 याप्रमाणे एकूण 227 लसीकरण केंद्र सुरु करण्यासाठी सर्व संबंधीत विभागीय सहाय्यक आयुक्तांनी कार्यवाही सुरु करावी. विभागातील आरोग्य केंद्र (हेल्थपोस्ट) हे प्रमाण मानून संबंधित परिसरातील नागरिकांसाठी असे लसीकरण केंद्र सुरु करावेत. पुरेशी जागा आणि आवश्यक सुविधा उपलब्ध असलेल्या ठिकाणी असे लसीकरण केंद्रं सुरु करावेत. महानगरपालिकेच्या दवाखान्यांसह नजीकच्या खासगी रुग्णालयांना देखील त्या लसीकरण केंद्रांशी संलग्न करावे. जेणेकरुन, लसीकरणाचा प्रतिकूल परिणाम जाणवल्यास उपचार करणे सोयीचे होईल.

Record! महाराष्ट्रात एका दिवसात 5 लाखांपेक्षा जास्त लोकांचं लसीकरण

मुंबईतील गृहनिर्माण संस्था, कॉर्पोरेट हाऊसेस, विविध कंपन्या यांनी खासगी रुग्णालयांसमवेत ‘टायअप’ करुन आपल्या सदस्यांच्या लसीकरणासाठी पुढाकार घ्यावा. लससाठा पुरेश्या प्रमाणात उपलब्ध होऊ लागल्यानंतर पात्र सदस्यांचे प्रत्यक्ष लसीकरण करुन घ्यावे, असे महानगरपालिकेच्या वतीने आवाहन करण्यात येत आहे. राज्य सरकारसह बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासन देखील लस उत्पादक कंपन्यांशी संपर्कात असून मुंबईला प्राधान्याने लससाठा मिळावा म्हणून प्रयत्न सुरु आहेत. लससाठ्याचा ओघ तसेच लसीकरण केंद्रांची संख्या वाढल्यानंतर मुंबईत दररोज किमान १ लाख नागरिकांचे लसीकरण करण्याचे उद्दिष्टे निश्चित करण्यात आले आहे, असे आयुक्त चहल यांनी अखेरीस नमूद केले.

    follow whatsapp