रात्रीचं जेवण झाल्यानंतर दारासमोर उभ्या राहून गप्पा मारणाऱ्या दोन सख्ख्या बहिणींना एका भरधाव स्कॉर्पिओने उडवलं आहे. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या दोन्ही बहिणींचे प्राण गेल्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यातील धनगर जवळका या गावात रविवारी रात्री हा प्रकार घडला. बेजबाबदारपणे गाडी चालवणाऱ्या चालकाने पुढे जात चार मित्रांनाही ठोकर देऊन उडवल्याचं कळतंय.
ADVERTISEMENT
रोहिणी गाडेकर (वय २२), मोहिनी गाडेकर (वय २६) अशी या दोन सख्ख्या बहिणींची नावं आहेत. काही दिवसांपूर्वी या दोन्ही बहिणी आपल्या गावी काही दिवसांकरता राहण्यासाठी आल्या होत्या. यातली रोहिणी ही नर्सिंगला तर मोहिनी ही एका खासगी कंपनीत कामाला होती. रविवारी रात्रीचं जेवण झाल्यानंतर घरासमोर गप्पा मारत असताना समोरुन आलेल्या भरधान स्कॉर्पिओने या दोन्ही बहिणींना उडवलं. गंभीररित्या जखमी झालेल्या या दोन्ही बहिणींना रुग्णालयात उपचारासाठी घेऊन जात असतानाच वाटेत त्यांचा मृत्यू झाला.
या घटनेनंतर स्कॉर्पिओ चालकाने पुढे जात वाढदिवस साजरा केल्यानंतर गप्पा मारत उभ्या असलेल्या चौघा मित्रांना ठोकर दिली. ज्यात एका मुलाला गंभीर जखम झाली असून त्याच्या डोक्याला सात टाके पडले आहेत. याप्रकरणी पोलिसांनी स्कॉर्पिओ गाडी ताब्यात घेत तपासाला सुरुवात केली आहे.
नागपूर : पार्किंगमधली कार बाहेर काढताना चालकाचं नियंत्रण सुटलं, अपघातात तरुण गंभीर जखमी
ADVERTISEMENT