विरार येथील एका रहिवासी इमारतीमध्ये काळजाचा थरकाप उडवणारी घटना समोर आली आहे. सोसायटीच्या आवारात खेळत असणाऱ्या एका दोन वर्षाच्या मुलाच्या अंगावरुन चारचाकी गाडी केली. परंतू केवळ दैव बलवत्तर म्हणून हा चिमुरडा यातून वाचला आहे. या घटनेचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
ADVERTISEMENT
विरार पश्चिमेच्या गोल्बल सिटी येथील गार्डन एव्हेन्यू येथे बोर्डे कुटुंब राहतं. उमा बेर्डे यांचा दोन वर्षांचा नातू तस्मय हा सोसायटीच्या आवारात खेळत होता. इतक्यात समोरुन येत असलेल्या एका गाडीने थेट तस्मयच्या अंगावर गाडी घातली. गाडीखाली कोणतरी आल्याचं लक्षात येताच या चालकाने तात्काळ गाडी थांबवली.
परंतू सुदैवाने या अपघातात तस्मयला कोणतीही इजा झाली नाही, तो सुखरुप बाहेर आला. बोर्डे कुटुंबियांनी या घटनेविरोधात अर्नाळा सागरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी कारचालकाविरुद्ध बेदरकारपणे गाडी चालवण्याबद्दल गुन्हा दाखल केला आहे.
ADVERTISEMENT