परमबीर सिंग प्रकरणात निलंबित झालेले पराग मणेरे पुन्हा सेवेत, ४३ अधिकाऱ्यांच्या बदल्या

दिव्येश सिंह

• 04:24 PM • 20 Oct 2022

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने पहिल्यांदाच पोलीस अधिकाऱ्यांच्या मोठ्या प्रमाणावर बदल्या केल्या आहेत. दिवाळीच्या आधीच राज्यातल्या ४३ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासूनच या बदल्या होतील या चर्चा होत्या. त्यानंतर पोलीस विभागातल्या या बदल्या झाल्याचं गृह विभागाने सांगितलं आहे. अधिकाऱ्यांची नावं आणि बदली झालेलं ठिकाण पदासह धनंजय कुलकर्णी […]

Mumbaitak
follow google news

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने पहिल्यांदाच पोलीस अधिकाऱ्यांच्या मोठ्या प्रमाणावर बदल्या केल्या आहेत. दिवाळीच्या आधीच राज्यातल्या ४३ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासूनच या बदल्या होतील या चर्चा होत्या. त्यानंतर पोलीस विभागातल्या या बदल्या झाल्याचं गृह विभागाने सांगितलं आहे.

हे वाचलं का?

अधिकाऱ्यांची नावं आणि बदली झालेलं ठिकाण पदासह

धनंजय कुलकर्णी -पोलीस अधीक्षक रत्नागिरी

पवन बनसोड पोलीस अधीक्षक, सिंधुदुर्ग

बसवराज तेली-पोलीस अधीक्षक सांगली

शेख समीर अस्लम-पोलीस अधीक्षक सातारा

अंकित गोयल पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण

शिरीष सरदेशपांडे, पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण

राकेश ओला-पोलीस अधीक्षक,अहमदनगर

एम. राजकुमार, पोलीस अधीक्षक, जळगाव

रागसुधा आर. पोलीस अधीक्षक, परभणी

संदीप सिंह गिल, पोलीस अधीक्षक, हिंगोली

श्रीकृष्ण कोकाटे, पोलीस अधीक्षक नांदेड

सोमय मुंडे, पोलीस अधीक्षक, लातूर

सारंग आवाड, पोलीस अधीक्षक बुलढाणा

गौरव सिंह, पोलीस अधीक्षक यवतमाळ

संदीप घुगे, पोलीस अधीक्षक अकोला

रविंद्रसिंग परदेशी, पोलीस अधीक्षक चंद्रपूर

नुरूल हसन, पोलीस अधीक्षक, वर्धा

निखिल पिंगळे, पोलीस अधीङक, गोंदिया

निलोत्पल, पोलीस अधीक्षक, गडचिरोली

श्रीकांत परोपकारी, पोलीस उपायुक्त, ठाणे शहर

सचिन पाटील, पोलीस अधीक्षक, गुन्हे अन्वेषण विभाग, औरंगाबाद

रा.पो.से. अधिकारी

लक्ष्मीकांत पाटील, प्राचार्य, पोलीस प्रशिक्षण केंद्र, नागपूर

पराग मणेरे, उपायुक्त, विशेष सुरक्षा विभाग, Vip Security मुंबई

पराग मणेरे पुन्हा सेवेत

खंडणी प्रकरणी आरोप झालेले अपर पोलीस अधिक्षक पराग मणेरे यांच्यावरील निलंबनाची कारवाई सरकारने मागे घेतली असून मणेरे यांना पुन्हा शासन सेवेत समाविष्ट करण्याचे आदेश गुरूवारी गृह विभागाकडून जारी करण्यात आले. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये ठाकरे सरकारने परमबीर सिंग यांना कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी सेवेतून निलंबित केले होते. यासोबतच खंडणी आणि भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या मणेरे यांच्यावरही शिस्तभंगाची कारवाई करून त्यांना निलंबित करण्यात आले होते. मणेरे हे त्यावेळी आर्थिक गुन्हे शाखेचे उपायुक्त होते.

महाविकास आघाडीच्या काळात पराग मणेरेंचं निलंबन

नागपूर येथे उत्पादन शुल्क विभागाचे अपर पोलीस अधीक्षक असताना मणेरे यांच्या विरोधात बाजारपेठ पोलीस ठाणे आणि कोपरी पोलीस ठाणे येथे गुन्हे दाखल झाले होते. महाविकास आघाडी सरकारने २०२१ मध्ये पराग मणेरे यांच्यावर निलंबनाची कारवाई केली होती. याशिवाय बांधकाम व्यावसायिक श्यामसुंदर अग्रवाल यांच्या प्रकरणातही मणेरे यांच्यावर आरोप झाले होते. त्यावेळी परमबीर सिंह यांच्याशी संगनमत करुन खोट्या गुन्हात अडकविल्याचा आणि खंडणी वसूल केल्याचा आरोप मणेरे यांच्यावर झाला होता. या प्रकरणात त्यांची बदलीही झाली होती.

    follow whatsapp