धनंजय साबळे, अकोला: वासनेच्या आहारी माणूस सारं काही विसरुन जातो आणि वासना क्षमविण्यासाठी कोणतंही पाऊल उचलतो. असाच काहीसा प्रकार हा अकोल्यात घडल्याचं आता समोर आलं आहे. एका 27 वर्षीय विवाहित महिलेचं एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलावर प्रेम जडलं. प्रेमाखातर तिने घर देखील सोडलं पण, प्रकरण पोलीस ठाण्यात पोहोचल्याने अल्पवयीन मुलावरील प्रेम त्या महिलेला चांगलंच महागात पडलं.
ADVERTISEMENT
जाणून घ्या नेमकं प्रकरण काय:
अकोल्यात एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. जिथे 27 वर्षीय महिलेने एका अल्पवयीन मुलाचं लैंगिक शोषण केल्याची खळबळजनक बाब समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी पॉस्को कलमांतर्गत गुन्हा दाखल करुन महिलेला अटक केली आहे. हे संपूर्ण प्रकरण धक्कादायक असंच आहे. मिळालेल्या माहितीनुसार 27 वर्षीय महिला ही विवाहित होती. पण तिने आपल्या पतीला सोडलं आहे.
अकोला शहरातील 17 वर्षीय अल्पवयीन मुलगा 31 जानेवारी 2022 रोजी घरातून अचानक रागाच्या भरात निघून गेला होता. त्यामुळे मुलाच्या नातेवाईकांनी खदान पोलिसांत धाव घेतली होती. पोलीस याप्रकरणाचा अधिक तपास करीत असताना मुलगा अचानक 9 फेब्रुवारी 2022 रोजी घरी परतला. त्यानंतर खदान पोलिसांकडून कागदोपत्री कारवाई करून मुलाला आई-वडिलांच्या स्वाधीन करण्यात आलं. मात्र, या सगळ्यात एक वेगळीच माहिती समोर आली ज्याने पोलिसांना देखील धक्का बसला. जाणून या सगळ्या प्रकरणाविषयी सविस्तरपणे.
मिळालेल्या माहितीनुसार, एक 27 वर्षीय विवाहित महिला आणि 17 वर्षीय अल्पवयीन मुलगा हे दोघेही एमआयडीसीमधील दालमिलमध्ये काम करायचे. इथे त्यांच्या प्रेमाची सुरुवात झाली. यानंतर दोघांमध्ये शारीरिक संबंध देखील प्रस्थापित झाले होते. सणार असं कुणालाही वाटले नाही…
27 वर्षीय महिला ही विवाहित होती. पण पतीसोबत भांडण झाल्याने ती पतीपासून वेगळी राहत होती. यावेळी ती आपल्या बहिणीच्या 9 वर्षीय मुलीसोबत राहत होती. दरम्यान, आरोपी महिला ही आपल्या भाचीला सोडून अचानक गायब झाली होती. त्यामुळे 31 जानेवारीपासून घरीच न परतल्याने घरमालकाने एमआयडीसी पोलीस महिला बेपत्ता असल्याची तक्रार नोंदविली. त्यानंतर महिलेच्या 9 वर्षीय भाचीला महिला व बालकल्याण समितीच्या ताब्यात देण्यात आले.
दुसरीकडे पोलिसांना एक 17 वर्षीय मुलगा देखील बेपत्ता असल्याची तक्रार मिळाली होती. त्यामुळे या दोन्ही तक्रारींचा एकमेकांशी काही संबंध आहे का हे देखील पोलिसांनी तपासून पाहिलं. अखेर 9 फेब्रुवारीला अल्पवयीन मुलगा हा आपल्या घरी परतला. त्यावेळी पोलिसांनी त्यांची चौकशी केली असता संपूर्ण प्रकार उघडकीस आला.
यानंतर महिलेला देखील पोलिसांनी ताब्यात घेतलं. सुरुवातीला तिने पोलिसांना खोटी माहिती दिली की, ती पुण्याला पतीकडे पैसे आणायला गेली होती. परंतु सखोल चौकशीनंतर तिने कबूल केलं की, ती 17 वर्षीय अल्पवयीन मुलासोबत होती. यावेळी तिने हे देखील कबूल केलं की, तिचं त्याच्यावर प्रेम आहे. त्यामुळे काही काळ दोघंही सोबतच होतो.
वाईमध्ये मामानेच केला अल्पवयीन भाचीवर बलात्कार, पीडित मुलगी गरोदर राहिल्याने समोर आली घटना
दरम्यान, यावेळी अल्पवयीन मुलासोबत लैंगिक संबंध प्रस्थापित करणं म्हणजेच लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी खदान पोलिसांनी महिलेला अटक केली असून आत तिच्याविरुद्ध बालसुरक्षा कायद्यानुसार (पॉक्सो) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ADVERTISEMENT