नागपूर येथे लग्न लावून परत येणाऱ्या मंडळीच्या मॅक्सीमो व्हॅनला भीषण अपघात झाल्याची घटना मंगळवारी (१५ फेब्रुवारी) रात्री घडली. या घटनेत ४ जण जागीच ठार झाले आहेत, तर ९ जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये एका ८ वर्षाच्या चिमुकल्याचाही समावेश आहे. अपघातातील चारही मृत हे एकाच घरातले आहेत. वाशिम जिल्ह्यातील वाशिम-शेलुबाजार मार्गावर व्हॅन अपघातग्रस्त झाली.
ADVERTISEMENT
नागपूर येथे लग्न सोहळा होता. वाशिममधील सावंगा जहागिर येथील वऱ्हाडी मंडळी लग्न आटोपून मॅक्सीमो व्हॅनने (एमएच ४८,पी-१४४५) परत येत होते. रात्री ९ वाजताच्या सुमारास गाडी वाशिम-शेलुबाजार रस्त्यावरील सोयता फाट्याजवळ आल्यानंतर हा अपघात झाला. भरधाव व्हॅन उभ्या असलेल्या ट्रॅक्टरवर जाऊन धडकली.
अभिनेता दीप सिद्धूचा अपघाती मृत्यू; घटनेनंतरचा व्हिडीओ आला समोर
चालकाचे व्हॅनवरील नियंत्रण सुटले आणि व्हॅन ट्रॅक्टरवर जाऊन आदळल्याची माहिती समोर आली आहे. हा अपघात इतका भीषण होता की, व्हॅनच्या काही भागाचा अक्षरक्षः चुराडा झाला.
वर्ध्याजवळ द्राक्षाच्या ट्रकचा अपघात, एकाचा मृत्यू; संधीसाधू लोकांनी मारला द्राक्षांवर डल्ला
या दुर्घटनेत भारत गवई (वय ३७), पूनम गवई (वय ३२) आणि सहा वर्षाच्या सम्राट गवई या चिमुकल्याचा जागीच मृत्यू झाला. अपघातात ९ जण जखमी झाले असून, यापैकी दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याचं समजते.
मुंबई-पुणे महामार्गावर सहा वाहनांचा भीषण अपघात, चार जणांचा मृत्यू, तिघे जखमी
अपघाताची माहिती मिळाल्यानंतर अधिकारी आणि नागरिकांनी जखमींना मदत केली. रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्यानंतर तातडीने जखमी रुग्णालयात हलवण्यात आलं. जखमींना वाशिम येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
ADVERTISEMENT