ठाणे : इमारतीचे स्लॅब कोसळून तीन जणांचा मृत्यू

मुंबई तक

• 10:27 AM • 12 Sep 2021

ठाण्याच्या राबोडी परिसरातील खत्री अपार्टमेंटच्या सी विंगचे ३ स्लॅब कोसळून तीन जणांनी आपले प्राण गमावले आहेत. सकाळी सहा वाजल्याच्या दरम्यान हा अपघात घडला आहे. या अपघातात तीन लोकं जखमी झाली असून त्यांना उपचारासाठी संजीवनी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. या अपघाताची माहिती कळताच ठाणे महापालिकेचे अधिकारी आणि बचाव पथकाने तात्काळ बचाव कार्याला सुरुवात केली. या […]

Mumbaitak
follow google news

ठाण्याच्या राबोडी परिसरातील खत्री अपार्टमेंटच्या सी विंगचे ३ स्लॅब कोसळून तीन जणांनी आपले प्राण गमावले आहेत. सकाळी सहा वाजल्याच्या दरम्यान हा अपघात घडला आहे. या अपघातात तीन लोकं जखमी झाली असून त्यांना उपचारासाठी संजीवनी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे.

हे वाचलं का?

या अपघाताची माहिती कळताच ठाणे महापालिकेचे अधिकारी आणि बचाव पथकाने तात्काळ बचाव कार्याला सुरुवात केली. या सोसायटीतील ७५ कुटुंबाना तात्काळ बाहेर काढण्यात आलं. या अपघातात एका जखमी मुलाची प्रकृती चिंताजनक असल्याचं कळतंय. अनेक कुटुंब यादरम्यान झोपेत असताना हा प्रकार घडल्यामुळे त्यांना सावरण्याचा वेळ मिळाला नाही. परंतू त्यांनी कसाबसा आपला जीव वाचवला.

अपघाताची माहिती कळताच ठाणे महापालिकेचे महापौर नरेश म्हस्के आणि पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी घटनास्थळी भेट दिली आहे. या सोसायटीतील रहिवाशांचं पुनर्वसन करण्यासाठी महापालिकेचे अधिकारी प्रयत्नशील आहेत.

    follow whatsapp