दोन स्कॉर्पिओ गाड्या, ३-४ कोटींची रोकड; गुजरातवरुन येणाऱ्या गाड्यांवर अमरावती पोलिसांची कारवाई

मुंबई तक

• 01:25 PM • 27 Jul 2021

अमरावती शहरातील राजापेठ पोलीस ठाण्याने दोन स्कॉर्पिओ गाड्यांमधून आलेली ३-४ कोटींची रोखरक्कम हस्तगत केली आहे. प्राथमिक चौकशीनुसार ही रक्कम गुजरातमधील एका हवाला कंपनीच्या माध्यमातून आल्याचं कळतंय. पोलिसांनी या प्रकरणी दोन चालकांसह चार आरोपींना अटक केली असून आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांना पाचारण करण्यात आलं आहे. गुजरातवरुन दोन गाड्या अमरावतीत येणार असल्याची माहिती राजापेठ पोलीस ठाण्याला मिळाली. यावरुन […]

Mumbaitak
follow google news

अमरावती शहरातील राजापेठ पोलीस ठाण्याने दोन स्कॉर्पिओ गाड्यांमधून आलेली ३-४ कोटींची रोखरक्कम हस्तगत केली आहे. प्राथमिक चौकशीनुसार ही रक्कम गुजरातमधील एका हवाला कंपनीच्या माध्यमातून आल्याचं कळतंय. पोलिसांनी या प्रकरणी दोन चालकांसह चार आरोपींना अटक केली असून आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांना पाचारण करण्यात आलं आहे.

हे वाचलं का?

गुजरातवरुन दोन गाड्या अमरावतीत येणार असल्याची माहिती राजापेठ पोलीस ठाण्याला मिळाली. यावरुन पोलीस अधिकाऱ्यांनी सापळा रचला. यावेळी फर्शी स्टॉप, पेट्रोल पंपाजवळील MH18BR1434, MH20DV5774 क्रमांक असलेल्या दोन गाड्या संशयास्पद पद्धतीने पोलिसांना आढळल्या. या दोन्ही गाड्यांची तपासणी केली असता सीटखाली ३-४ कोटींची रक्कम ठेवल्याचं पोलिसांना आढळून आलं.

प्राथमिक माहितीनुसार गुजरातमधील हवाला रॅकेटच्या माध्यमातून ही रक्कम अमरावतीत आली होती. विजयकुमार या व्यक्तीने ही रक्कम पाठवल्याचं काही कागदपत्रांमधून समोर आलं आहे. त्यामुळे या प्रकरणाच्या मुळाशी जाण्यासाठी पोलिसांनी आयकर विभागाला पाचारण केलं असून सर्व कागदपत्रांची खातरजमा केली जात आहे. परंतू अमरावतीत इतक्या मोठ्य़ा प्रमाणात रक्कम आल्यामुळे सर्वत्र चर्चेला विषय मिळाला आहे.

    follow whatsapp