पालघर जिल्ह्यातील आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण होण्याच्या घटनांमध्ये वारंवार वाढ होताना दिसत आहे. जव्हार येथील आश्रम शाळेतील प्रकारानंतर पालघरमधील नंडोरे येथील आश्रमशाळेतील ३१ जणांना कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक बातमी समोर येते आहे. यापैकी ३० जणं विद्यार्थी असून यात एका शिक्षकाचाही समावेश आहे.
ADVERTISEMENT
Exclusive : कोरोनाची वाढती रुग्णसंख्या हे महाराष्ट्र सरकारचं अपयश नाही – डॉ. रमण गंगाखेडकर
या घटनेनंतर पालकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलेलं असून एकाच वेळी ३० विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे पालकांनी संताप व्यक्त केला आहे. काही दिवसांपूर्वी आश्रमशाळेतील १९३ विद्यार्थी आणि ३४ शिक्षक व इतर कर्मचाऱ्यांनी कोरोना चाचणी घेण्यात आली होती. यापैकी ३० विद्यार्थी आणि एका एका शिक्षकाच्या चाचणीचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. ज्या विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाली आहे ते सर्व ९ वी ते १२ वी चे विद्यार्थी आहेत. तालुका आरोग्य अधिकारी अभिजीत खंडारे यांनी याविषयी माहिती दिली.
राज्यात कोरोना रुग्णांची फेब्रुवारी महिन्यापासून झपाट्याने वाढते आहे. राज्यात सध्या 1 लाख 38 हजार 813 अक्टिव्ह कोरोना रुग्ण आहेत. कोरोना रुग्णांची वाढती संख्या ही आरोग्य विभागाच्या डोकेदुखीचा भाग झालीय. पण असं असलं तरी यातली दिलाश्याची बाब म्हणजे याचा कमी असलेला मृत्यूदर.
राज्याच्या आरोग्य मंत्रालयाच्या सर्व्हेलन्स विभागातील अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांनी मुंबई तकशी बोलताना दिलेल्या माहितीनुसार आता राज्यात दिसणारा कोरोना हा 2020 च्या कोरोनाच्या तुलनेत सौम्य आहेत. ज्यामुळे रुग्णांची संख्या मोठी असली तरी कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूच्या संख्या कमी असल्याचं दिसयं.
राज्यातील मृत्यूदर जानेवारी महिन्यात 1.66 टक्के एवढा होता. मागच्या दीड महिन्यात तो 1 टक्क्यांपेक्षा कमी झाल्याची माहिती डॉ. आवटे यांनी मुंबई तका दिली आहे. तर, मार्च महिन्यात .55 टक्के वर आल्याचं त्यांनी सांगितलं. मार्च 2021मध्ये राज्यातील कोरोनामुळे होणारा सरासरी मृत्यूदर 2.26 आहे. राज्यातील कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूदरात ऑक्टोबर महिन्यापासून घट होत असल्याची माहिती डॉ. आवटे यांनी दिली आहे. फेब्रुवारी महिन्यात राज्याचा मृत्यूदर हा 2.49 टक्के एवढा होता. फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीला राज्याचा मृत्यूदर 2.52 टक्के होता.
दरम्यान, महाराष्ट्रात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला सुरुवात झाली आहे. मात्र असं असून देखील कोरोना चाचणी, ट्रॅकिंग, आयसोलेटेड केसेस आणि क्वॉरंटाइन कॉन्टॅक्ट हे खूपच मर्यादित आहे. असा अहवाल महाराष्ट्रातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आलेल्या केंद्रीय समितीने सादर केल्यानंतर केंद्रीय आरोग्य सचिवांनी महाराष्ट्राच्या मुख्य सचिवांना एक भलं मोठं पत्रच पाठवलं आहे.
कोरोना प्रादुर्भाव थांबवण्यासाठी राज्यातल्या काही भागांमध्ये अंशतः लॉकडाऊन, नवे निर्बंध लादण्यात आले, काही ठिकाणी नाईट कर्फ्यूही लावण्यात आला आहे. मात्र या सगळ्या उपाय योजनांचा फारसा परिणाम झालेला नाही, असं म्हणत केंद्रीय आरोग्य सचिवांनी महाराष्ट्रातील कोरोना उपाययोजनांबाबत नाराजी व्यक्त केली आहे.
महाराष्ट्रात कोरोना रूग्ण वाढत आहेत. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्याच्या तुलनेत मार्चमध्ये कोरोना रूग्णांच्या वाढीचा आलेख चढता आहे. महाराष्ट्रातील अनेक शहरांमध्ये संसर्ग होण्याचं प्रमाण वाढलं असल्याचं सध्या दिसतं आहे.
कोरोना व्हायरसबाबत तुमच्या मनातले प्रश्न आणि त्यांची उत्तरं
ADVERTISEMENT