देशातल्या 17 राज्यांमध्ये ओमिक्रॉनचा शिरकाव झाला आहे. भारतात एकूण 358 रूग्ण आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी शुक्रवारी ही माहिती दिली आहे. यापैकी 117 रूग्ण बरे झाले आहेत असंही त्यांनी सांगितलं आहे. इतर रूग्णांवर उपचार सुरू आहेत अशीही माहिती देण्यात आली आहे.
ADVERTISEMENT
ओमिक्रॉन व्हेरिएंट आढळलेल्या 183 रूग्णांच्या केसचं अॅनालिसीस करण्यात आलं आहे. 183 पैकी 87 जणांनी कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन डोस घेतल्याची माहिती समोर आली. एवढंच नाही तर या 87 जणांपैकी तिघांनी बूस्टर डोसही घेतला होता. यापैकी सात जण असे आहेत ज्यांनी कोरोना प्रतिबंधक लसीचा एकही डोस घेतला नव्हता. 121 जण विदेशातून परतले आहेत. तर 44 जण हे ओमिक्रॉन व्हेरिएंट आढळलेल्यांच्या लोकांच्या संपर्कात आले होते त्यामुळे त्यांना या व्हेरिएंटची बाधा झाली.
यावेळी सरकारतर्फे WHO चाही हवाला देण्यात आला. डेल्टाच्या तुलनेत ओमिक्रॉन व्हेरिएंट हा जास्त वेगाने पसरतो आहे. या व्हेरिएंटमुळे कोरोना रूग्ण दीड ते तीन दिवसात दुप्पट होत आहेत असं आरोग्य मंत्रालयाने सांगितलं. जगात सध्या कोरोनाची चौथी लाट आली आहे. आपण सावधगिरी बाळगली पाहिजे तसंच प्रत्येकाने कोव्हिड प्रोटोकॉलही पाळला पाहिजे असंही सांगण्यात आलं आहे.
युरोप, नॉर्थ अमेरिका, अफ्रिका या देशात कोरोनाचे रूग्ण वाढत आहेत. तर आशियायी देशांमध्ये कोरोना रूग्ण कमी होत आहेत. भारतात कोरोनाच्या दोन लाटा आल्या. पहिली लाट सप्टेंबर 2020 आणि दुसरी लाट मे 2021 मध्ये आता तिसरी लाट येऊ नये यासाठी सर्वतोपरी काळजी घेतली पाहिजे तसंच तिसरी लाट आली तर सामोरं जाण्यासाठी तयारीही केली पाहिजे असंही स्पष्ट करण्यात आलं.
जगभरातल्या 108 देशांमध्ये 1 लाख 51 हजारहून जास्त ओमिक्रॉन व्हेरिएंटचे रूग्ण आढळले आहेत. त्यापैकी 26 जणांचा मृत्यू झाला आहे. सर्वाधिक जास्त रूग्ण हे युके, डेन्मार्क, कॅनडा, नॉर्वे आणि जर्मनी या देशांमध्ये आढळले आहेत.
Omicron Variant: ‘पुढील महिना सर्वात धोकादायक’, ओमिक्रॉन व्हेरिएंटबाबत शास्त्रज्ञांचा इशारा
जगभरात डेल्टानंतर आता कोरोनाचे नवीन प्रकार ओमिक्रॉनचे व्हेरिएंटचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. भारतात, केंद्र सरकारने राज्यांना प्रत्येक स्तरावर खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. या वाढत्या रुग्णसंख्येमुळे अंदाज लावला जात आहे की, 2022 मध्येही कोरोना महामारीपासून मुक्तता मिळणार नाही. कारण ओमिक्रॉननंतर आता आणखी एक नवा व्हेरिएंट समोर आला आहे.
काय आहे Delmicron व्हेरिएंट?
मीडिया रिपोर्ट्समध्ये असे म्हटले जात आहे की, कोरोनाच्या डेल्टा आणि ओमिक्रॉन व्हेरिएंटच्या म्युटेशनने नवा व्हेरिएंट Delmicron हा नवीन व्हेरिएंट तयार झाला आहे. या व्हेरिएंटने अमेरिका आणि युरोपमध्ये अक्षरश: कहर निर्माण केला आहे.
ADVERTISEMENT