मुंबईत आज दिवसभरात 3879 रूग्ण कोरोना बाधित झाले आहेत तर पुण्यात 3260 नव्या कोरोना रूग्णांची नोंद झाली आहे. पुण्यातील एकूण कोरोना रूग्णांची संख्या 4 लाख 36 हजार 349 एवढी झाली आहे. तर मुंबईतील कोरोना रूग्णांची एकूण संख्या 6 लाख 65 हजार 299 इतकी झाली आहे.
ADVERTISEMENT
कोरोना प्रतिबंधक लसीचा दुसरा डोस वेळेत न मिळाल्यास काय करावे?
मुंबईत आज दिवसभरात 3686 रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर पुण्यात आज दिवसभरात 3303 रूणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. पुण्यात आत्तापर्यंत एकूण 3 लाख 89 हजार 499 रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर मुंबईत आत्तापर्यंत एकूण 5 लाख 98 हजार 545 रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
मुंबईत दिवसभरात 77 रूग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. तर आत्तापर्यंत मुंबईत एकूण 13 हजार 547 रूग्णांचा मृत्यू झाला आहे. पुण्यात आज दिवसभरात 64 रूग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. तर आत्तापर्यंत पुण्यात एकूण 7 हजार 118 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
पॉझिटिव्ह बातमी, मुंबईत कोरोना रुग्ण होत आहेत कमी
पुण्यात आज दिवसभरात 19790 चाचण्या झाल्या आहेत. आत्तापर्यंत 22 लाख 10 हजार 238 एकूण चाचण्या झाल्या आहेत. तर मुंबई दिवसभरात 35 हजार 377 चाचण्या झाल्या आहेत. तर आत्तापर्यंत झालेल्या एकूण चाचण्यांची संख्या 55 लाख 78 हजार 236 इतकी झाली आहे.
ADVERTISEMENT