अमरावती : माजी राज्यमंत्री प्रवीण पोटेंच्या कॉलेजमध्ये विजेचा शॉक लागून चार कर्मचाऱ्यांचा मृत्यू

मुंबई तक

• 10:27 AM • 29 Dec 2021

अमरावतीत एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. माजी राज्यमंत्री आणि भाजप आमदार प्रवीण पोटे यांच्या अमरावती येथील पोटे इंजिनीअरिंग कॉलेजमध्ये चार कर्मचाऱ्यांचा विजेचा शॉक लागून मृत्यू झाला आहे. कॉलेजच्या गेटला कलर करण्याचं काम सुरु असताना हा शॉक लागल्याचं कळतंय. अक्षय सावरकर (वय २६), प्रशांत शेलोरकर (वय ३१), संजय दंडनाईक (वय ४५), गोकुळ वाघ (वय २९) […]

Mumbaitak
follow google news

अमरावतीत एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. माजी राज्यमंत्री आणि भाजप आमदार प्रवीण पोटे यांच्या अमरावती येथील पोटे इंजिनीअरिंग कॉलेजमध्ये चार कर्मचाऱ्यांचा विजेचा शॉक लागून मृत्यू झाला आहे. कॉलेजच्या गेटला कलर करण्याचं काम सुरु असताना हा शॉक लागल्याचं कळतंय.

हे वाचलं का?

अक्षय सावरकर (वय २६), प्रशांत शेलोरकर (वय ३१), संजय दंडनाईक (वय ४५), गोकुळ वाघ (वय २९) अशी या मृत कर्मचाऱ्यांची नावं आहेत. हे चौघे याच कॉलेजमध्ये शिपाई म्हणून कार्यरत होते. मिळालेल्या माहितीनुसार कॉलेज प्रशासनाने मुख्य गेटला रंगरंगोटीचं काम हाती घेतलं होतं.

या कामासाठी बाहेरुन माणसं न बोलावता कॉलेज प्रशासनाने कॉलेजमधील कर्मचाऱ्यांनाच रंगरंगोटीचं काम करायला सांगितलं. ज्यानुसार हे चारही शिपाई रंग देण्याचं काम करत होते. लोखंडी शिडीवर चढून गेटला रंग देण्याचं काम करत असताना वरुन जाणाऱ्या विजेच्या तारेचा धक्का लागल्यामुळे चारही कामगार जमिनीवर कोसळले. ज्यात तिघांचा जागेवरच तर एका कर्मचाऱ्याचा रुग्णालयात दाखल करताना मृत्यू झाला.

घटनेची माहिती कळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून या प्रकरणाचा पुढील तपास सुरु आहे. घडलेल्या प्रकाराबद्दल कॉलेज प्रशासनावर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी होते आहे.

    follow whatsapp