इंदापूर : शेततळ्यामध्ये विषारी औषध टाकल्याने पाच टन माशांचा मृत्यू

मुंबई तक

• 12:42 PM • 10 Aug 2021

पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील भीमा नदीकाठच्या पळसदेव परिसरातील एका मच्छी पालन केलेल्या शेततळ्यात अज्ञाताने खोडसाळपणे विषारी औषध टाकल्याने पाच हजार पेक्षा जास्त मासे मृत्यूमुखी पडल्याची घटना उघड झाली आहे. याप्रकरणी अशोक सुखदेव केवटे या शेतकऱ्याने इंदापूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. गेल्या पंधरा दिवसांपूर्वीच इंदापूर तालुक्यातल्या पोंधवडी गावात शेततळ्यामध्ये असलेले मासे चोरीला गेल्याचा प्रकार घडला […]

Mumbaitak
follow google news

पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील भीमा नदीकाठच्या पळसदेव परिसरातील एका मच्छी पालन केलेल्या शेततळ्यात अज्ञाताने खोडसाळपणे विषारी औषध टाकल्याने पाच हजार पेक्षा जास्त मासे मृत्यूमुखी पडल्याची घटना उघड झाली आहे.

हे वाचलं का?

याप्रकरणी अशोक सुखदेव केवटे या शेतकऱ्याने इंदापूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. गेल्या पंधरा दिवसांपूर्वीच इंदापूर तालुक्यातल्या पोंधवडी गावात शेततळ्यामध्ये असलेले मासे चोरीला गेल्याचा प्रकार घडला होता. त्यानंतर शेततळ्यामध्ये विषारी औषध टाकल्याचा प्रकार उघड झाला आहे. यामध्ये शेततळ्यातील सुमारे पाच टन मासे मृत्युमुखी पडले आहेत. रूपचंद जातीचे हे मासे अज्ञाताने विषारी औषध पाण्यात टाकून मारल्याचा त्यांना संशय असून, त्यांनी इंदापूर पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

याबाबत केवटे यांनी माहिती दिली की, “शेलारपट्टा परिसरातील आमच्या दोनशे बाय शंभर लांबी-रुंदीच्या शेततळ्यामध्ये आम्ही आठ महिन्यांपूर्वी रूपचंद जातीचे सुमारे तीस हजार बीज सोडले होते. सध्या या माशांचे वजन अडीचशे ते सातशे ग्रॅम इतके झाले आहे. मात्र, रात्रीच्या वेळी कोणीतरी अज्ञाताने पाण्यात विषारी औषध टाकल्याने सुमारे ५ टनांहून अधिक मासे मृत्युमुखी पडल्याचा अंदाज आहे. सकाळी माशांना खाद्य टाकण्यासाठी शेततळ्यावर गेल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे. सध्या बाजारात हे मासे ९० ते १०० रुपये प्रतिकिलो दराने विक्री होत आहेत. त्यामुळे बाजारभावाप्रमाणे आमचे पाच लाखांचे नुकसान झाले आहे.”

    follow whatsapp