दिलासा! मुंबईत सलग पाचव्या दिवशी कोरोना रूग्णसंख्या 8 हजारांपेक्षा कमी

मुंबई तक

• 03:21 PM • 23 Apr 2021

मुंबईत सलग पाचव्या दिवशी कोरोना रूग्णसंख्या 8 हजारांपेक्षा कमी रूग्ण आढळले आहेत. ही बाब निश्चितच काहीशी समाधानकारक आहे. मात्र कोरोना पूर्णपणे नियंत्रणात आला आहे असं नाही. दिवसभरात मुंबईत 7 हजार 221 पॉझिटिव्ह रूग्ण आढळले आहेत. तर दिवसभरात 9 हजार 541 रूग्ण बरे झाले आहेत. तर दिवसभरात 72 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मात्र समाधानाची बाब […]

Mumbaitak
follow google news

मुंबईत सलग पाचव्या दिवशी कोरोना रूग्णसंख्या 8 हजारांपेक्षा कमी रूग्ण आढळले आहेत. ही बाब निश्चितच काहीशी समाधानकारक आहे. मात्र कोरोना पूर्णपणे नियंत्रणात आला आहे असं नाही. दिवसभरात मुंबईत 7 हजार 221 पॉझिटिव्ह रूग्ण आढळले आहेत. तर दिवसभरात 9 हजार 541 रूग्ण बरे झाले आहेत.

हे वाचलं का?

तर दिवसभरात 72 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मात्र समाधानाची बाब ही आहे की सलग पाचव्या दिवशी रूग्णसंख्या ही 8 हजारांपेक्षा कमी आढळली आहे. तरीही काळजी घेण्याची गरज आहे असंही मुंबई महापालिकेने म्हटलं आहे. आज घडीला मुंबईत 81 हजार 538 रूग्ण सक्रिय आहेत.

महाराष्ट्रात पुन्हा Lockdown का लावावा लागतो आहे? आदित्य ठाकरेंनी सांगितलं कारण

आत्तापर्यंत मुंबईत एकूण 6 लाख 16 हजार 221 रूग्णांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यापैकी एकूण 5 लाख 20 हजार 684 रूग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. आत्तापर्यंत 12 हजार 648 रूग्णांचा मृत्यू झाला आहे. मुंबईचा रिकव्हरी रेट 84 टक्के इतका आहे. कोरोना रूग्णांचा डबलिंग रेट 52 दिवसांवर आहे. मुंबईत आज घडीला 122 कंटेन्मेंट झोन आहेत. तर मुंबईत 1 हजार 211 इमारती सील करण्यात आल्या आहेत.

मागील चार दिवसांमधील रूग्णसंख्या आणि मृत्यू

22 एप्रिल- 7140 कोरोना रूग्ण, 75 मृत्यू

21 एप्रिल 7684 कोरोना रूग्ण, 62 मृत्यू

20 एप्रिल – 7,294 कोरोना रूग्ण, 35 मृत्यू

19 एप्रिल – 7,381 कोरोना रूग्ण, 57 मृत्यू

इंडिया टुडेशी बोलताना कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे यांनीही सांगितलं की निर्बंध लादण्यात आले आहेत त्यामुळे कोरोना रूग्णसंख्या कमी होते आहे. पण आपण बेसावध राहणं चूक आहे. येत्या काही दिवसांमध्ये कोरोना रूग्ण कमी होतील यासाठीच लॉकडाऊन लावण्यात आला आहे.

‘येत्या 15 दिवसात फक्त मुंबईतल्याच नाही तर राज्यातल्याही केसेस कमी होतील. लोकांना प्रादुर्भावापासून रोखणं हे खूप आवश्यक आहे त्यासाठी आम्ही सगळे प्रयत्न करत आहोत’ असंही आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केलं. दुसऱ्या लाटेत कोरोनाचा प्रादुर्भाव प्रचंड वाढला आहे. अशा वेळेस कोरोना रूग्णांची संख्या नियंत्रणात आणणं याकडेच आम्ही लक्ष केंद्रीत करतो आहे असंही आदित्य ठाकरेंनी स्पष्ट केलं.

    follow whatsapp