नागपूर शहरात नंदनवन भागात राहणाऱ्या एका वयोवृद्ध निवृत्त महिला डॉक्टरची गळा चिरुन हत्या करण्यात आली आहे. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे. नंदनवन परिसरातील गायत्री नगर भागात राहणाऱ्या डॉक्टर देवकीबाई बोबडे यांना खुर्चीला बांधून गळा चिरत मारेकऱ्यांनी हत्या केली आहे.
ADVERTISEMENT
नंदनवन पोलिसांना या घटेनविषयी माहिती समजताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आहे. डॉ. देवकीबाई बोबडे या नागपुरातील टीबी हॉस्पिटलमधून सेवानिवृत्त झाल्या आहेत. नंदनवर परिसरातील गायत्री नगर भागात बोबडे यांचं निवासस्थान आहे. ही हत्या लुटमारीच्या उद्देशाने झाली की कोणत्या वेगळ्या कारणामुळे याचा तपास सध्या पोलीस अधिकारी करत आहेत.
महत्वाची गोष्ट म्हणजे घडलेल्या घटनेपासून नंदनवर पोलीस ठाणं हे हाकेच्या अंतरावर आहे. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेबाबत पोलिसांसाठी स्थानिक भागांत नाराजीचा सूर उमटत आहे. नागपूरचे पोलीस आयुक्त अमितेशकुमार, सह पोलीस आयुक्त अस्वती दोर्जे यांच्यासह नागपूर गुन्हे शाखेचे आणि स्थानिक पोलिसांचे वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी घटनास्थळी भेट दिली आणि आरोपींच्या शोधासाठी विविध पथके तयार करण्यात आले असून आरोपींचा शोध घेतला जात आहे.
ADVERTISEMENT