DA Hike : केंद्रीय कर्मचाऱ्यांना दसरा-दिवाळीचं गिफ्ट! केंद्राकडून महागाई भत्त्यात बंपर वाढ

मुंबई तक

• 10:07 AM • 28 Sep 2022

dearness allowance hike by 4 percent : महागाई भत्ता वाढण्याच्या निर्णयाला केंद्रीय मंत्रिमंडळात मंजुरी देण्यात आली आहे. दिवाळी-दसऱ्या आधीच केंद्रीय कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारकडून गिफ्ट मिळालं आहे. केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ४ टक्क्यांची वाढ केली आहे. केंद्र सरकारने महागाई भत्त्यात चार टक्क्यांची वाढ केली आहे त्यामुळे महागाई भत्ता आता ३४ वरून ३८ टक्के झाला […]

Mumbaitak
follow google news

dearness allowance hike by 4 percent : महागाई भत्ता वाढण्याच्या निर्णयाला केंद्रीय मंत्रिमंडळात मंजुरी देण्यात आली आहे. दिवाळी-दसऱ्या आधीच केंद्रीय कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारकडून गिफ्ट मिळालं आहे. केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ४ टक्क्यांची वाढ केली आहे.

हे वाचलं का?

केंद्र सरकारने महागाई भत्त्यात चार टक्क्यांची वाढ केली आहे त्यामुळे महागाई भत्ता आता ३४ वरून ३८ टक्के झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेत झालेल्या कॅबिनेट बैठकीत महागाई भत्ता वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला. याचा लाभ एक कोटींहून अधिक केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनर्सना झाला आहे.

३४ वरून ३८ टक्के झाला आहे DA

केंद्र सरकारने लागू केलेली महागाई भत्त्यातली वाढ ही जुलै २०२२ ते डिसेंबर २०२२ या काळासाठी असणार आहे. कर्मचारी आणि पेन्शनर्स यांना आता ३८ टक्के प्रमाणे महागाई भत्ता मिळणार आहे. ही वाढ सातव्या वेतन आयोगाच्या शिफारसीप्रमाणे असणार आहे. सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना ३४ टक्क्यांप्रमाणे महागाई भत्ता दिला जातो. मात्र वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर आता सरकारने ३८ टक्के अशी चार टक्क्यांची वाढ केली आहे. त्यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांची दसरा दिवाळीत घसघसशीत रक्कम मिळणार आहे.

महागाई भत्ता वाढवल्याचा फायदा १ कोटीहून अधिक कर्मचारी आणि पेन्शन धारकांना होणार आहे. एखाद्या कर्मचाऱ्याचे मूळ वेतन ५६ हजार रुपये असल्यास ३८ टक्के महागाई भत्ता वाढल्या त्यांना २१, २८० रुपये महागाई भत्ता म्हणून मिळतील. म्हणजे दरमहा २२४० रुपये मिळणार आहेत. वर्षाला २५५३६० रुपये मिळतील. याचा अर्थ आधीच्या तुलनेत २६,८८० रुपये अधिक मिळतील.

एखाद्या कर्मचाऱ्याचे मूळ वेतन १८ हजार रुपये असेल तर ३४ टक्के दराने त्याला ६१२० रुपये मिळतात. मात्र, महागाई भत्ता ३८ टक्के केल्यानंतर ६८४० रुपये महागाई भत्ता मिळणार.

केंद्र सरकारकडून किरकोळ महागाईच्या आकडेवारीच्या आधारे जानेवारी आणि जुलै महिन्यात वर्षातून दोनदा DA आणि DR मध्ये सुधारणा करण्यात येते. देशातील महागाई अद्यापही सहा टक्क्यांच्या वर आहे. महागाईवर नियंत्रण मिळवण्यासाठी आरबीआयकडून प्रयत्न सुरू आहेत. सध्या सुरू असलेल्या पतधोरण आढावा बैठकीत आरबीआय व्याजदर वाढवण्याची शक्यता आहे.

    follow whatsapp