ADVERTISEMENT
रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी हे केवळ भारतातीलच नव्हे तर आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असून त्यांची संपत्ती 80 अब्ज डॉलर एवढी आहे.
Mukesh Ambani यांचे ‘Antilia’ हे निवासस्थान अगदी राजवाड्यासारखे आहे आणि याला जगातील सर्वात महागडे घर देखील म्हटलं जातं.
अटलांटिक महासागरातील एका पौराणिक बेटाच्या नावावरुन हे नाव ठेवण्यात आलं आहे. शिकागो येथील एका वास्तुविशारदाने हे तयार केले आहे.
7 वर्षांच्या बांधकामानंतर 2010 मध्ये अंबानीचे अँटिलिया पूर्ण झाले. ऑस्ट्रेलियन कन्स्ट्रक्शन कंपनी ‘लॅग्टन होल्डिंग’ने ते बांधले आहे.
27 मजली अँटिलिया 4,00,000 स्क्वेअर फूटमध्ये पसरले आहे आणि या घरात सुमारे 600 लोक काम करतात.
घराच्या प्रत्येक खोलीचं इंटिरिअर हे प्रचंड वेगळं असून या इमारतीचे पहिले सहा मजले केवळ पार्किंगसाठी राखीव आहेत.
6 मजल्यांच्या पार्किंगमध्ये 168 कार पार्क केल्या जाऊ शकतात. पार्किंगच्या वरच्या मजल्यावर एक 50 सीटर सिनेमा हॉल आणि त्याच्या वर एक आऊटडोर गार्डन आहे.
अँटिलियामध्ये 9 मोठ्या लिफ्ट आणि 3 हेलिपॅड आहेत. तसेच योगा स्टुडिओ, आईस्क्रीम रूम, 3 स्विमिंग पूल, 1 स्पा आणि मंदिर देखील आहे.
या घराची रचना अशा प्रकारे करण्यात आली आहे की त्यात जास्तीत जास्त 8 रिश्टर स्केलच्या भूकंपाचे धक्के सहन करण्याची क्षमता आहे.
रिपोर्ट्सनुसार, मुकेश अंबानी यांचे घर 200 कोटी डॉलर्स म्हणजेच सुमारे 11 हजार कोटी रुपये खर्चून बांधले आहे.
अंबानी कुटुंबातील प्रत्येकासाठी वेगवेगळे मजले आहेत आणि मुकेश अंबानी-नीता अंबानी हे टॉप फ्लोअरच्या अगदी खालच्या मजल्यावर राहतात.
ADVERTISEMENT