19 year old youth stealing 13 bikes for Girlfriend: डोंबिवली: कल्याण, (Kalyan) डोंबिवली (Dombivli) आणि भिवंडी (Bhiwandi) परिसरातून प्रेयसीच्या (Girlfriend) नादाने बुलेटसह 13 दुचाकी (Bike) चोरणाऱ्या एका 19 वर्षाच्या सराईत चोरट्याला कल्याण गुन्हे शाखेच्या तपास पथकाने भिवंडी जवळील राजनोली गावातील एका चाळीतून अटक केली. त्याच्या ताब्यातून 16 लाख रुपये किमतीच्या एकूण 13 दुचाकी पोलिसांनी जप्त केल्या आहेत. शुभम भास्कर पवार असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. (a 19 year old youth wreaked havoc stealing as many as 13 bikes to please his girlfriend)
ADVERTISEMENT
कल्याण-डोंबिवली परिसरात गेल्या काही महिन्यांपासून दुचाकी, रिक्षा चोरीचे प्रमाण वाढले आहे. दररोज दोन ते तीन वाहनं चोरी होत असल्याचे गुन्हे पोलीस ठाण्यात दाखल होत आहेत. वाहन चोरीचे गुन्हे उघड करण्यासाठी कल्याण गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर शिरसाठ यांनी विशेष तपास पथक स्थापन केले. वाहन चोरीच्या गुन्ह्यांचा तपास गुन्हे शाखेच्या पथकाकडून सुरू असताना या पथकातील अंमलदार गुरुनाथ जरग यांना सीसीटीव्ही चित्रणाच्या आधारे एक वाहन चोर शिळफाटा रस्त्यावरील कोळेगाव हद्दीत फिरत असल्याची माहिती मिळाली.
मुंबई : प्रेयसी गावी जाऊन नये म्हणून त्याने घेतला ७ महिन्यांच्या चिमुकल्याचा जीव
त्यानुसार उपनिरीक्षक मोहन कळमकर, अंमलदार गुरुनाथ जरग यांनी कोळेगाव हद्दीत संशयितरित्या फिरणाऱ्या शुभम पवार याला ताब्यात घेतले. त्याची चौकशी सुरू केल्यावर त्याने कल्याणमधील महात्मा फुले पोलीस ठाणे हद्दीतून एक बुलेट चोरून. ती आपण आपल्या लातूर जिल्ह्यातील यल्नूर गावी ठेवली असल्याची माहिती दिली.
महात्मा फुले चौक पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी लातूर येथे जाऊन ही बुलेट आणली. त्या गुन्ह्यात शुभम पवारला अटक केली. त्याची कसून चौकशी सुरू केल्यावर शुभमने आपण कल्याण, डोंबिवली, भिवंडी परिसरातून एकूण 13 दुचाकी वाहने चोरल्याची कबुली दिली. गुन्हे शाखेचे वरिष्ठ निरीक्षक शिरसाठ यांच्या पथकाने पुणे, सोलापूर, निलंगा, लातूर जिल्ह्यात शुभमने चोरुन विक्री केलेल्या दुचाकी गेल्या दहा दिवसाच्या कालावधीत जप्त केल्या.
महात्मा फुले चौक पोलीस ठाणे हद्दीतून शुभम याने पाच, रामनगर पोलीस ठाणे हद्दीतून दोन, विष्णूनगर पोलीस ठाणे हद्दीतून दोन, कोनगाव हद्दीतून दोन आणि कोळसेवाडी हद्दीतून त्याने एक दुचाकी चोरली होती. या दुचाकी चोराने आणखी काही चोऱ्या केल्या आहेत याचा तपास पोलीस करत आहेत. पण धक्कादायक बाब म्हणजे फक्त गर्लफ्रेंडला खुश करण्यासाठी शुभम या गाड्या चोरत असल्याचं तपासात समोर आलं आहे.
कोल्हापूर: लग्न झालेली प्रेयसी प्रियकरासोबत पळून आली कोल्हापुरात, धर्मशाळेत गळफास घेऊन दोघांचीही आत्महत्या
सहाय्यक पोलीस आयुक्त राजकुमार डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने ही कारवाई केली. आता या प्रकरणी पोलीस शुभमसोबत इतरही कोणी चोऱ्यांमध्ये सहभागी होतं का? याचाही तपास करत आहेत.
ADVERTISEMENT