ADVERTISEMENT
स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून अवघ्या महाराष्ट्राचं कुलदैवत असणाऱ्या खंडेरायाच्या जेजुरी गडावर आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे.
स्वातंत्र्य दिनानिमित्त मंदिराच्या गाभाऱ्यात तिरंगी फुलांची आकर्षक अशी आरास करण्यात आली.
कोरोनामुळे मंदिरे बंद असली तरी नित्य पूजा पाठ सुरू आहेत.
आज देवस्थानच्या वतीने स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून गाभाऱ्यात आकर्षक सजावट करण्यात आली.
जेजुरीच्या मंदिरात ज्याप्रमाणे तिरंग्याच्या रंगातील फुलांची सजावट करण्यात आली आहे तशीच सजावट पंढरपूरच्या विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात देखील करण्यात आली आहे.
याबरोबरच टोकियोत पार पडलेल्या ऑलिंपिक सुवर्णपदक विजेता निरज चोप्राचं आकर्षक रांगोळीच्या माध्यमातून अभिनंदन देखील करण्यात आलं आहे.
जेजुरी देवस्थानच्या वतीने रांगोळीच्या माध्यमातून नीरज चोपडा यांना आगळ्यावेगळ्या पद्धतीने शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.
ही रांगोळी मंदिराच्या प्रांगणात काढण्यात आली आहे.
ADVERTISEMENT