मुंबई: आपल्या धडाकेबाज शैलीने आणि माध्यमांमध्ये आपल्या वक्तव्यांनी चर्चेत असलेल्या राष्ट्रवादीच्या काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा आणि माजी आमदार विद्या चव्हाण यांच्याविरोधात मुंबईतील सांताक्रुज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजप नेते मोहित कंबोज यांनी हा गुन्हा दाखल केला आहे.
ADVERTISEMENT
विद्या चव्हाणांवर गुन्हा दाखल का झाला?
विद्या चव्हाण यांनी एका खाजगी वृत वाहिनीशी बोलताना भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, किरीट सोमय्या आणि मोहित कंबोज यांच्याबाबत आक्षेपार्ह टिपण्णी केली होती त्यामुळे विद्या चव्हाण यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आयपीसी कलम ५०५/२, ३७/१, १३५, ५०० अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विद्या चव्हाण यांनी पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्याबाबत कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
राष्ट्रवादीचे नेते मोहित कंबोज यांच्या निशाण्यावर
भाजप नेते मोहित कंबोज मागच्या अनेक दिवसांपासून महाविकास आघाडीच्या नेत्यांवर गंभीर आरोप करत आहेत. विरोधी पक्षनेते अजित पवार तसेच राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्याविरोधात मोहित कंबोज यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. यामुळे राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी मोहित कंबोज यांच्याविरोधात बोलण्यास सुरुवात केली आहे. याबाबतच प्रतिक्रिया देताना विद्या चव्हाण विद्या चव्हाण यांनी भाजपवरती हल्ला चढवला आहे.
आमदार रोहित पवारांवरती कोणत्या प्रकरणात आरोप?
आमदार रोहित पवार हे ग्रीन एकर रिसॉर्ट्स अँड रिलेटर्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत 2006 ते 2012 दरम्यान संचालक होते. रोहित पवार यांचे वडील राजेंद्र पवारही 2006 ते 2009 दरम्यान कंपनीचे संचालक होते. त्यावेळी कंपनीत येस बॅक घोटाळ्यातील आरोपी राकेश वाधवान आणि सारंग वाधवान यांच्याही सहभाग होता. मात्र, येस बँक घोटाळ्यात नाव आल्यावर त्यांनी या कंपनीच्या संचालक पदाचा राजीनामा दिला होता.
याशिवाय या कंपनीत संचालक असणारे इतर सदस्य हे सध्या वाधवान यांच्यासोबत इतर कंपन्यांमध्ये पार्टनर आहेत. यामध्ये बाबासाहेब सुर्यवंशी, लखमिंदर सिंग, धोंडू जडयार अरविंद पाटील यांच्या नावांचा सामावेश आहे. ज्यावेळी रोहित पवार ग्रीन एकर रिसॉर्ट्स अँड रिलेटर्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीतून बाहेर पडले त्यावेळी हळूहळू इतर 4 सदस्य देखील त्या कंपनीतून बाहेर पडले. रोहित पवारांच्या या संपूर्ण प्रकरणावरती मोहित कंबोज यांनी ट्विट करत टीका केली होती.
ADVERTISEMENT