पुणे जिल्ह्याल्या शिरूर तालुक्यातल असलेल्या पाबळ येथील स्मशानभूमीत अंधश्रद्धेचा अघोरी प्रकार समोर आला आहे. एका काळ्या पिशवीमध्ये त्यावर कोहळ्याचा भोपळा त्यावर टाचणी टोचून एका मुलीचा फोटो व तिथे काही वस्तू आढळून आल्या आहे. मुलीचा फोटो कोहळ्याला लावून त्याला टाचण्या टोचलेल्या अवस्थेत आढळल्या.
ADVERTISEMENT
पाबळ गावच्या स्मशानभूमीत दोन दिवसांपूर्वी काळ्या पिशवीत कोहळ्याला एका मुलीचा फोटो टाचणीच्या मदतीने टोचण्यात आला होता आणि त्यावर कुंकू लावण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे गावातील काही लोक दशक्रिया विधींसाठी स्मशानभूमीत गेले असता हा सगळा प्रकार त्यांच्या नजरेस पडला. यामुळे लोकांच्या मनामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. हा प्रकार लोकांच्या लक्षात आला तेव्हा त्यांनी तेथील स्थानिक पत्रकारांना संपर्क केला आणि याबाबतची माहिती कळविली याविषयी बोलताना महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या नंदिनी जाधव म्हणाल्या की करणी करण्यासाठी किंवा त्या व्यक्तीचे वाईट व्हावे या उद्देशाने उतारे टाकण्यात आलेले असतात परंतु त्यामुळे कोणत्याही व्यक्तीचे वाईट होत नसते.
उतारे टाकणाऱ्या लोकांमध्ये एक प्रकारची विकृती असते यामुळे अशी कृत्ये केली जातात त्यामुळे गावातील लोकांना एवढेच सांगणे आहे की अशा लोकांना कोणी घाबरून जाऊ नये. या लोकांचा शोध घेऊन पोलिस प्रशासनाने योग्य ती कारवाई करावी. पाबळ गावात काही लोक स्मशानविधीसाठी गेले होते. तिथे त्या लोकांना कोहळ्याला एक फोटो दिसला. लोक घाबरले आहेत. मात्र या कृतीने घाबरून जाऊ नये असंही आवाहन नंदिनी जाधव यांनी केलं आहे. या प्रकरणी पोलीस आता पुढे तपास करत आहेत. त्या भागात असलेल्या सीसीटीव्ही कॅमेराच्या आधारे हे सगळं कुणी केलं आहे याचा शोध घ्यावा आणि संबधित व्यक्तीवर कारवाई करावी अशी मागणी अंनिसने केली आहे.
फोटोमध्ये असलेली मुलगी कोण आहे? हा प्रकार काय आहे याचा शोध आता पोलीस घेत आहेत. स्मशानभूमीत आलेल्या लोकांना हा प्रकार समजल्यावर ते घाबरले त्यांनी तातडीने काही पत्रकारांना कळवलं. पत्रकारांनी ही बाब अंधश्रद्धा निर्मूलन समितीला आणि पोलिसांनाही कळवलं. आता पुढील तपास सुरू करण्यात आला आहे.
ADVERTISEMENT