राज्यासह देशभरात दिवाळी सुरू झाली आहे. दिवाळी साजरी करण्यासाठी प्रत्येकचजण आपल्या आपल्या परिने तयारी करत असतो. आता राज्यात दिवाळीचा उत्सव सुरू झाला आहे. कोरोनाच्या संकटात दोन वर्षे गेल्यानंतर पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणावर दिवाळीचा उत्साह दिसून येतो आहे. यंदा दिवाळी ही कुठल्याही निर्बंधाशिवाय साजरी केली जाते आहे. अशात पुणेकरांनी सोने-चांदी खरेदीत विक्रम केला आहे. एक दिवसात १५० कोटींचे दागिने पुण्यात विकत घेतले गेले आहेत.
ADVERTISEMENT
दोन वर्षांनी बाजारपेठांमध्ये उत्साह
धनत्रयोदशीच्या दिवशी मोठी खरेदी करण्यात आली. अक्षय तृतीयेपासून बाजार खुलला आहे. दिवाळीच्या सिझनमध्ये लोक बाहेर पडली आहे. खरेदीसाठी गर्दी झाली आहे. सोन्याचे भाव स्थिर राहिल्याने लोक आनंदाने खरेदी करत आहेत. धनत्रयोदशीच्या दिवशी पुण्यात १५० कोटींची दागिने खरेदी झाली आहे असं पुणे सराफ बाजार असोसिएशनचे फतेहचंद राका यांनी दिली आहे.
पुण्यात सोने-चांदीची रेकॉर्डब्रेक खरेदी
दिवाळीत सोने खरेदीचा उत्साह हा कायमच पाहायाला मिळतो. मात्र या वर्षी लोकांनी रेकॉर्ड ब्रेक खरेदी केली आहे असंही राका यांनी सांगितलं आहे. भारतात सोन्यामागे धार्मिक भावना आहेत. त्यामुळे सोने चांदीची बंपर खरेदी झाली आहे. महिला वर्गाने मोठ्या प्रमाणावर खरेदी केली आहे. त्यामुळे यावर्षी पुण्यात सोने चांदी आणि हिरे दागिने विक्री रेकॉर्डब्रेक झाली आहे. एका दिवसात सोने चांदी आणि हिरे विक्री ही १५० कोटींच्या आसपास झाल्याची माहिती फत्तेहचंद राका यांनी दिली आहे.
सोनं आणि चांदी खरेदीला विशेष मान
दिवाळीत सोनं आणि चांदी खरेदीला विशेष मान असतो. दिवाळीचे चारही दिवस सोनं खरेदी केली जाते. एकट्या पुण्यात धनत्रयोदशीच्या दिवशी १५० कोटींची खरेदी झाली आहे. सराफ व्यावसायिकांसाठी ही आनंदाची बातमी आहे. तसंच यावर्षी पुणेकर महिलांनीही त्यांचं सोनं-चांदी खरेदीचं बजेट हे डबल केलं आहे असंही काही महिलांनी मुंबई तकशी बोलताना स्पष्ट केलं.
ADVERTISEMENT