झाकीर मेस्त्री, वसई
ADVERTISEMENT
वसईच्या (Vasai) सनसिटी परिसरात वॉकिंगसाठी गेलेल्या 27 वर्षीय तरुणाला आपला हकनाक जीव गमवावा लागला आहे. एका मद्यधुंद दुचाकीस्वाराने दिलेल्या जोरदार धडकेत (two-wheeler Accident) 27 वर्षीय तरुणाचा जीव (Death) गेल्याची धक्कदायक घटना घडली आहे.
या गंभीर अपघातात मनिष मनोहरसिंह कार्की (वय 27 वर्ष) या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. हा तरुण नुकताच परदेशात नोकरी करून वसईतल्या आपल्या नातेवाईकांकडे राहण्यासाठी आला होता.
नेहमीप्रमाणे तो बुधवरील संध्याकाळच्या सुमारास रस्त्यावर वॉक करत होता. दरम्यान, 8 वाजेच्या सुमारास मद्यपान करून भरधाव वेगाने येणाऱ्या एका दुचाकीस्वाराने त्याला धडक दिली व तिथून पळ काढला. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या या तरुणाला स्थानिकांनी उपचारासाठी रुग्णालयात देखील नेलं. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
घटनास्थळी धडक दिलेल्या दुचाकी वाहनाची नंबरप्लेट मिळाली असून ती गाडी नालासोपारा पूर्वेतील एका माजी नगरसेविकेच्या मुलाचा नावाने आरटीओमध्ये रजिस्टर असल्याची माहिती मिळाली आहे. या प्रकरणी माणिकपूर पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
दरम्यान, ही गाडी जरी माजी नगरसेविकेच्या मुलाची असली तरीही ती गाडी नेमकं कोण चालवत होतं याबाबतची माहिती अद्याप मिळू शकलेली नाही. त्यामुळे याप्रकरणी माणिकपूर पोलीस अधिक तपास करीत आहेत.
मर्सिडिजची धडक, सख्ख्या भावांचा मृत्यू; हॉटेलियरच्या मुलाला अटक
मात्र, दुर्देवाची बाब म्हणजे, एका उच्चशिक्षित तरुणाला आपला हकनाक जीव गमवावा लागला आहे. ज्यामुळे त्याच्या कुटुंबीयांना प्रचंड धक्का बसला आहे. तसेच या अपघातातील दुचाकीस्वाराला कठोर शासन व्हावं अशीही मागणी त्याच्या नातेवाईकांनी केली आहे.
तसंच अनेक ठिकाणी तरुण मद्यप्राशन केलेल्या अवस्थेत बाइक किंवा कार चालवत असल्याचं आढळून येतं. मद्यपी ड्रायव्हरांना चाप बसावा यासाठी सरकारने कठोर दंडाची तरतूद केलेली आहे. मात्र, असं असून देखील अनेक मद्यपी ड्रायव्हार अतिशय बेदरकारपणे गाडी चालवत असल्याचं पाहायला मिळतं. त्यातूनच असे भीषण अपघात घडतात. ज्यामध्ये काही निष्पाप लोकांना आपले प्राण गमवावे लागतात. त्यामुळे अशा मद्यपी चालकांना आळा बसावा यासाठी शासनाने कठोरात कठोर नियम लागू करण्याची गरज आहे. जेणेकरुन अशा घटना टळू शकतील.
ADVERTISEMENT