– योगेश पांडे, नागपूर प्रतिनिधी
ADVERTISEMENT
नागपूर शहरातील जरीपटका भागात भंगाराच्या दुकानात २० रुपयांमध्ये आधारकार्ड मिळत असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. स्थानिक आम आदमी पक्षाच्या नेत्यांनी केलेल्या स्टिंग ऑपरेशनमुळे ही घटना समोर आली असून यानंतर जरीपटका पोलिसांनी कारवाई करत या दुकानातून १०० पेक्षा जास्त आधारकार्ड जप्त केली आहेत.
जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मेकोसाबाग परिसरात एका भंगाराच्या दुकानातून केवळ वीस रुपये घेऊन आधार कार्ड मिळत असल्याची माहिती आम आदमी पक्षाच्या नेत्यांना मिळाली होती. यानंतर आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी स्टिंग ऑपरेशन करून माहितीची पडताळणी केली असता भंगार दुकान मालकाकडे अनेकांच्या नावाचे आधार कार्ड असल्याचं दिसून आलं. केवळ २० रुपयांमध्ये हा भंगारमालक या आधारकार्डाची विक्री करताना दिसून आले. त्यानंतर आपचे कार्यकर्ते प्रभात अग्रवाल यांनी जरीपटका पोलिसांना या संदर्भात सूचना दिल्यानंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत भंगाराच्या दुकानातून १०० पेक्षा जास्त आधारकार्ड जप्त केले आहेत.
नागपुरातील मेकोसाबाग परिसरात कचरा वेचणाऱ्या एका व्यक्तीला कचऱ्याच्या ढिगार्यात आधार कार्डाचं एक बंडल मिळून आले. त्याने ते बंडल समोरच असलेल्या भंगार दुकानातील मालकाच्या स्वाधीन केले. आधारकार्डावर असलेल्या मोबाईल नंबर वर फोन करून आधार कार्ड धारकला 20 रुपयांचा मोबदला देऊन ते आधार कार्ड विक्री केले जात होते, एवढचं नाही तर ज्यांनी आधारकार्डची मागणी केली त्यांना सुद्धा पैसे घेऊन आधार कार्ड उपलब्ध करून दिले जात असल्याचा खुलासा झाला आहे. पोलिसांनी या प्रकरणात सहभागी असलेल्यांची चौकशी सुरू केली आहे.
ज्या विहिरीत मिळाला चिमुकल्याचा मृतदेह, दुसऱ्या दिवशी तिथेच सापडला पित्याचा मृतदेह
ADVERTISEMENT