मेट्रो कारशेडमध्ये घोटाळा…आदित्य ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप

मुंबई तक

15 Apr 2023 (अपडेटेड: 15 Apr 2023, 01:20 PM)

Aaditya Thackeray big allegation on CM Eknath Shinde :कांजूर मार्गच्या 44 हेक्टर जमीनीवरील 15 हेक्टर जागा मेट्रो लाईन 6 साठी एमएमआरडीएला हस्तांतरीत करण्यात आलीय. त्यामुळे यातील उर्वरीत जागा बिल्डरांच्या घशात घालायला ठेवलीय का असा सवाल (UBT)माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी केला.

Aaditya Thackeray big allegation on CM Eknath Shinde

Aaditya Thackeray big allegation on CM Eknath Shinde

follow google news

Aaditya Thackeray big allegation on CM Eknath Shinde :कांजूर मार्गच्या 44 हेक्टर जमीनीवरील 15 हेक्टर जागा मेट्रो लाईन 6 साठी एमएमआरडीएला हस्तांतरीत करण्यात आली. त्यामुळे यातील उर्वरीत जागा बिल्डरांच्या घशात घालायला ठेवलीय का असा सवाल (UBT)माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी केला. तसेच हा सरासर मोठा घोटाळा आहे, त्यामुळे घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांनी यावर उत्तर द्यावे, अशी मागणी आदित्य ठाकरे यांनी केली आहे. यावर आता मुख्यमंत्री काय उत्तर देतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. (aaditya thackeray big allegation on cm eknath shinde om metro carshed kanjurmarg)

हे वाचलं का?

आदित्य ठाकरे पत्रकार परिषदेत बोलत होते. आम्ही सतत अडीच-तीन वर्ष बोलत होतो, लाईन 6 साठी कारशेड गरजेचे आहे. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आरे कारशेड कांजूरमार्गला हलवले होते. लाईन 3, 6, 14 आणि लाईन 4 या चार लाईनचे कार डेपो आपण एकत्र करणार होतो. त्यावेळी जनतेचे, महाराष्ट्राचे पैसै वाचावे आणि वेळ वाचावा, हाच आमचा हेतू होता. चार कारशेड एकत्र केल्याने महाराष्ट्राचे 10 हजार कोटी वाचणार होते. जेव्हा आम्ही हे हे पाऊल उचललं ते्व्हा आरेचे 800 हेक्टर जंगल घोषित करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला याची आठवण आदित्य ठाकरे यांनी यावेळी करून दिली.

हे ही वाचा : कोणत्या प्रकरणात देवेंद्र फडणवीसांना चढावी लागली कोर्टाची पायरी?

या घटनेत महाराष्ट्र भाजपाने केद्राला हाक मारली आणि केद्राच्या सॉल्ट कमिश्नरन कोर्टात गोंधळ घातला. यामुळे मुंबईकरांना या इँटिग्रेटेड डेपोपासून वंचित राहावे गेले. तसेच मुंबईकरांचे पैसे कसे उडवले जातील यावर लक्ष केंद्रीत केले गेले. तसेच सरकार पाडल्यानंतर सुप्रीम कोर्टातील केस बंद झाली. याचिकाकर्त्यांना देखील याचिका मागे घेतली. मग आता ही जागा कोणाची आहे? असा सवाल आदित्य ठाकरे यांनी केला आहे.

लाईन 3 आरेत, लाईन 6 कांजूर, 4 आणि 14 चे कार डेपो ठाण्यात आहेत. सध्याचे घटनाबाह्य मुख्यमंत्री यांचा त्याच्यात किती हात होता हे मला माहित नाही. हे कार डेपो कितीला खरेदी होणार आहेत? कोण मध्यंस्थी आहे?, कुणाच्या नावावर सात बारे आहेत? कोणत्या जमीनी आहेत? कोणाच्या मतदार संघातून जमीनी घेणार आहेत? असे अनेक सवाल आदित्य ठाकरे यांनी सरकारला करत घेरले आहे.

हे ही वाचा : ‘सावरकर म्हणायचे की बलात्कार हे एक…’, ‘या’ बड्या नेत्याच्या मुलीचं खळबळजनक वक्तव्य

आम्ही जनतेच्या आणि महाराष्ट्राचे पैसै वाचवण्यासाठी चार डेपो कांजूरमार्गमध्ये करत होतो. आम्ही हे पाऊल उचलंल आणि भाजपने राजकीय गोंधळ घातला. जेव्हा काऱशेड तिथे नेणार होतो, तेव्हा केंद्राने असो वा भाजपने महाऱाष्ट्रावर इतके वार का केले? खंजीर का खुपसला? जेणकरून ही महाराष्ट्राची अधिकाराची जागा इतके वर्ष महाराष्ट्राला मिळू नये,असा सवाल देखील केला.

    follow whatsapp