ADVERTISEMENT
अनेक स्त्रिया या लग्नानंतर लगेच गर्भवती राहतात. पण त्यावेळी बाळाची जबाबदारी घेण्याची त्यांची तयारी नसते.
अशा स्थितीत गर्भधारणा टाळण्यासाठी त्या गर्भनिरोधक उपाय करतात, परंतु काहीवेळेस ते प्रभावी ठरत नाहीत.
गर्भनिरोधक पद्धती अयशस्वी ठरण्याची अनेक कारणं आहेत.
जसं की, गर्भनिरोधक वेळेवर न वापरल्यानेही गर्भधारणा होते किंवा स्त्रिया कॉपर टीचा वापर करूनही ते अप्रभावी ठरतं.
गर्भनिरोधक पद्धती अयशस्वी झाल्यामुळे महिलांना गर्भपात करण्याचा निर्णय घ्यावा लागतो.
यामुळे महिलांच्या आरोग्यावर परिणाम होतो. त्यांना मानसिक धक्काही बसतो.
गर्भपातानंतर काही काळ स्त्रिया डिप्रेशनमध्येही जाण्याची शक्यता असते.
त्यामुळे गर्भपाताचं पाऊल उचलताना डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे. नाहीतर, त्याचे गंभीर परिणाम उद्भवू शकतात.
ADVERTISEMENT