अमरावती : बलात्कार – अपहरणाच्या आरोपाखाली अटक असलेल्या आरोपीची लॉकअपमध्ये आत्महत्या

मुंबई तक

• 11:45 AM • 20 Aug 2021

अपहरण, बलात्कार यासारख्या गंभीर आरोपांमध्ये अटकेत असलेल्या आरोपीने पोलीस लॉकअपमध्येच आपल्याच शर्टाने फाशी घेत आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अमरावतीमधल्या राजापेठ पोलीस ठाण्यात ही घटना घडली आहे. आत्महत्या केलेल्या आरोपीचं नाव सागर ठाकरे असं असून एका अल्पवयीन मुलीला प्रेमसंबंधातून पळवून नेल्याचा आरोप सागरवर लावण्यात आला होता. पीडीत मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरुन फेजरपुरा पोलीस […]

Mumbaitak
follow google news

अपहरण, बलात्कार यासारख्या गंभीर आरोपांमध्ये अटकेत असलेल्या आरोपीने पोलीस लॉकअपमध्येच आपल्याच शर्टाने फाशी घेत आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अमरावतीमधल्या राजापेठ पोलीस ठाण्यात ही घटना घडली आहे.

हे वाचलं का?

आत्महत्या केलेल्या आरोपीचं नाव सागर ठाकरे असं असून एका अल्पवयीन मुलीला प्रेमसंबंधातून पळवून नेल्याचा आरोप सागरवर लावण्यात आला होता. पीडीत मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरुन फेजरपुरा पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी आरोपीला अटक केली. परंतू लॉकअपची सोय नसल्यामुळे त्याला राजापेठ पोलीस ठाण्यात ठेवण्यात आलं होतं.

आरोपी सागर ठाकरेला अटक केल्यानंतर न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. मिळालेल्या माहितीनुसार मुलीचे वयाचे प्रेमसंबंध होते. परंतू मुलगी अल्पवयीन असल्यामुळे आरोपीने आरोपी सागरविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या सर्व प्रकरणात दुःखी झालेल्या सागरने आपलाच शर्ट काढून लॉकअपमध्ये गळफास घेत आपलं जीवन संपवल्याचं बोललं जातंय.

महत्वाची गोष्ट म्हणजे हा प्रकार ज्यावेळी घडला तेव्हा राजापेठ पोलीस ठाण्याचे अधिकारी कुठे होते असा प्रश्न आता विचारला जात आहे. दरम्यान अमरावतीच्या पोलीस आयुक्तांनी या प्रकरणाची दखल घेतली असून चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.

मुंबईकडे येणाऱ्या विदर्भ एक्स्प्रेसमध्ये रेल्वे पोलिसांची मोठी कारवाई; लाखो रुपये जप्त

    follow whatsapp