नेटफ्लिक्सच्या Unfreedom मध्ये झळकलेला अभिनेता राहुल वोहरा याचं निधन झालं आहे. राहुलला कोरोनाची लागण झाली होती. गेल्या काही दिवसांपासून कोरोनाशी लढत असलेल्या राहुलने अखेरचा श्वास घेतला. दरम्यान राहुलने मृत्युपूर्वी फेसबुकवर एक पोस्ट केली होती. ज्यामध्ये त्याने मदतही मागितली होती.
ADVERTISEMENT
शनिवारी लिहिलेल्या फेसबुकवर पोस्टमध्ये राहुलने म्हटलं होतं की, “जर माझ्यावर चांगले उपचार झाले असते तर मी वाचू शकलो असतो. मी लवकरच जन्म घेईन आणि चांगलं काम करेन. आता मी ध्यैर्य गमावलं आहे.” या फेसबुक पोस्टमध्ये त्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मनिष सिसोदिया यांनाही टॅग केलं होतं.
काही दिवसांपूर्वी त्याला कोरोनाची लागण झाली होती. कोरोना झाल्यानंतर सातत्याने राहुलची तब्येत खालावत होती. यामुळे त्याला राजीव गांधी सुपर स्पेशालिटी रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.
मृत्यूपूर्वी राहुलने केलेली ही पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होतेय. अखेर राहुलची कोरोनाशी झुंज अपयशी ठरली. राहुलने पोस्टमध्ये लिहील्या प्रमाणेच त्याने सगळ्यांचा निरोप घेतला. यामुळे आता सर्वांकडून हळहळ व्यक्त केली जातेय.
ADVERTISEMENT