केतकी चितळेला अटक! गुन्हे शाखेच्या कोठडीत गेली रात्र, आता पुढे काय होणार?

मुंबई तक

• 05:09 AM • 15 May 2022

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर टीका करताना त्यांच्या आजाराबद्दल विकृत मजकूर असलेली पोस्ट अभिनेत्री केतकी चितळे (Ketaki Chitale) शेअर केली होती. या प्रकरणात केतकी चितळेला (Ketaki chitale) शनिवारी (14 मे) सायंकाळी पोलिसांनी अटक केली. ठाणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून तिच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली. अटकेनंतर तिला गुन्हे शाखेच्या पोलीस कोठडीत ठेवण्यात आलं. दरम्यान, तिला […]

Mumbaitak
follow google news

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर टीका करताना त्यांच्या आजाराबद्दल विकृत मजकूर असलेली पोस्ट अभिनेत्री केतकी चितळे (Ketaki Chitale) शेअर केली होती. या प्रकरणात केतकी चितळेला (Ketaki chitale) शनिवारी (14 मे) सायंकाळी पोलिसांनी अटक केली.

हे वाचलं का?

ठाणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून तिच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली. अटकेनंतर तिला गुन्हे शाखेच्या पोलीस कोठडीत ठेवण्यात आलं. दरम्यान, तिला न्यायालयासमोर हजर केलं जाणार आहे. त्यातच आता पुणे पोलिसांकडून तिच्यावर अटकेची कारवाई होण्याची शक्यता आहे. त्यामुळे केतकी चितळेच्या अडचणी दिवसेंदिवस वाढण्याची शक्यता दिसत आहे.

छोट्या पडद्यावरील अभिनेत्री केतकी चितळेला ठाणे पोलिसांच्या गुन्हे शाखेनं शनिवारी (१४ मे) अटक केली. केतकी चितळेला कळंबोलीतून ताब्यात घेण्यात आलं होतं. त्यानंतर तिला अटक करण्यात आली. गुन्हे अन्वेषण शाखेकडून अटक करण्यात आल्यानंतर तिला कोठडीत ठेवण्यात आलं.

केतकी चितळेला ताब्यात घेत असताना बराच गोंधळ शनिवारी बघायला मिळाला. पोलिसांकडून केतकीला ताब्यात घेण्याची कारवाई होत असताना संतापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत निषेध केला. यावेळी केतकी चितळेवर अंडी आणि शाहीफेकही करण्यात आल्याचाही प्रकार घडला.

केतकी चितळे अडकणार?

अॅड. नितीन भावे (Advocate Nitin Bhave) याने लिहिलेली पोस्ट केतकी चितळेने तिच्या फेसबुकवर शेअर केली होती. तिच्या या पोस्टमुळे वादंग निर्माण झालं. राष्ट्रवादीच्या नेत्यासह शिवसेना, काँग्रेस आणि मनसेनं याचा निषेध केला. याच पोस्टप्रकरणी तिच्याविरुद्ध गुन्हे दाखल झाले आहेत.

ठाण्यातील मुंब्रा ठाण्यात आणि पुणे सायबर सेलकडेही केतकी चितळेविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. केतकी सध्या ठाणे पोलिसांच्या ताब्यात आहे. तिला दुपारी सुट्टीच्या काळातील न्यायालयात हजर केलं जाणार आहे. दरम्यान, आता पुणे पोलिसांकडूनही केतकी चितळेला अटक करण्याची शक्यता आहे. केतकीविरुद्ध ठाणे, पुण्याबरोबरच नाशिक, धुळे आणि गोरेगावमध्ये गुन्हे दाखल झाल्याची माहिती आहे.

केतकी चितळेने काय केली होती पोस्ट?

केतकी चितळेने शेअर केलेल्या पोस्टमधील मजकूर नितीन भावे नावाच्या व्यक्तीने लिहिलेला आहे.

“तुका म्हणे पवारा l नको उडवू तोंडाचा फवारा ll

ऐंशी झाले आता उरक l वाट पहातो नरक

सगळे पडले उरले सुळे l सतरा वेळा लाळ गळे ll

समर्थांचे काढतो माप l ते तर तुझ्या बापाचेही बाप ll

ब्राह्मणांचा तुला मत्सर l कोणरे तू ? तू तर मच्छर ll

भरला तुझा पापघडा l गप! नाही तर होईल राडा ll

खाऊन फुकटचं घबाड l वाकडं झालं तुझं थोबाड ll

याला ओरबाड त्याला ओरबाड l तू तर लबाडांचा लबाड ll

-अॅड. नितीन भावे (Advocate Nitin Bhave)

    follow whatsapp