ADVERTISEMENT
अभिनेत्री किर्ती कुल्हारीने ४० व्या वर्षात पदार्पण केलं आहे. हिंदी सिनेसृष्टीतली एक गुणी अभिनेत्री म्हणून किर्तीची ओळख आहे. इंदू सरकारमधल्या तिच्या अभिनयाचं कौतुक झालं आहे
किर्ती कुल्हारी आणि साहिल सहगल यांचं २०१६ मध्ये लग्न झालं होतं. त्याआधी दोघेही एकमेकांना डेट करत होते. जाहिरात शूट करताना या दोघांची ओळख झाली होती
२०२१ मध्ये मात्र साहिल सहगल आणि किर्तीचा घटस्फोट झाला. आधी साहिलसोबत ओळख, मग मैत्री त्यानंतर प्रेम आणि लग्न इथवर झालेला प्रवास चांगला होता. पण दोघांचा संसार अवघा पाच वर्षेच टिकला
सुरूवातीला मी काही फार मोठी अभिनेत्री नव्हते मात्र पिंक सिनेमा केल्यानंतर मला चांगले प्रोजेक्ट मिळाले असं किर्तीने एका मुलाखतीत सांगितलं होतं.
लग्नाच्या ५ वर्षांनंतर किर्ती कुल्हारीनं सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत पती साहिलपासून विभक्त होत असल्याचं जाहीर केलं. तिच्या या निर्णयामुळे अनेकांना धक्का बसला होता.
किर्ती कुल्हारीच्या फोर मोअर शॉट्स या वेबसीरिजचेही दोन सिझन येऊन गेले त्यांना चांगला प्रतिसाद मिळाला आहे. तसंच उरी या सिनेमात तिने केलेला रोल आणि मिशन मंगल सिनेमातला रोलही प्रेक्षकांना भावला
ADVERTISEMENT