मुंबई: बॉलिवूड अभिनेत्री आणि शिवसेना नेत्या उर्मिला मातोंडकर हिला कोरोनाची लागण झाली आहे. याबाबतची माहिती तिने स्वत: आज सकाळी सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना दिली आहे. कोरोनाची लागण झाल्यानंतर उर्मिलाने स्वतःला घरीच क्वारंटाइन करुन घेतले आहे. यासोबतच दिवाळीच्या निमित्ताने प्रत्येकाने स्वतःची काळजी घेण्याचे आवाहनही तिने केले आहे.
ADVERTISEMENT
उर्मिला मातोंडकरने ट्विट करुन अशी माहिती दिली आहे की, ‘मला कोरोना व्हायरस पॉझिटिव्ह झाली आहे. मी सध्या ठीक आहे आणि मी स्वतःला होम क्वारंटाईन असून स्वत:ला आयसोलेट केलं आहे. माझ्या संपर्कात आलेल्या सर्व लोकांना विनंती आहे की त्यांनी त्वरित स्वत:ची चाचणी करुन घ्यावी.’
दरम्यान, उर्मिला मातोंडकरने आपल्या चाहत्यांना आवाहन केलं आहे की, दिवाळीच्या सणात प्रत्येकाने स्वतःची काळजी घ्यावी. याबाबत तिने आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे की, ‘तुम्हा सर्व प्रियजनांना नम्र विनंती आहे की, दिवाळी सणादरम्यान तुम्ही स्वतःची काळजी घ्या.’
उर्मिलाने तिच्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात बालकलाकार म्हणून केली होती. ती पहिल्यांदा 1977 साली ‘कर्मा’ चित्रपटात दिसली होती, पण ‘मासूम’ (1983) या चित्रपटातून तिला खरी ओळख मिळाली. त्यानंतर ‘रंगीला’, ‘जुदाई’, ‘खूबसूरत’, ‘जंगल’, ‘प्यार तूने क्या किया’, ‘एक हसीना थी’ आणि ‘पिंजर’ यांसारखे एका पेक्षा एक हिट चित्रपटात तिने काम केले आहे.
उर्मिलाने हिंदीशिवाय तेलुगू, मल्याळम, मराठी आणि तमिळ सिनेमांमध्येही काम केले आहे. तिला फिल्मफेअरसह अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. तिने आपल्या सौंदर्यासोबतच उत्कृष्ट अभिनयाने चाहत्यांची मने जिंकली आहेत.
उर्मिलाने 2019 मध्ये काँग्रेसच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढवली होती पण त्यात तिला पराभव स्वीकारावा लागला होता. दरम्यान, त्यानंतर तिने काँग्रेसला रामराम करत मागील वर्षी तिने शिवसेनेत प्रवेश केला होता.
‘या’ बॉलिवूड सेलिब्रिटींनाही करावा लागलाय कोरोनाचा सामना
दरम्यान, गेल्या काही दिवसांत अनेक सेलिब्रिटींना कोरोना व्हायरसची लागण झाली आहे. अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन, वरुण धवन, सोनू सूद, अर्जुन रामपाल, आलिया भट्ट, रणबीर कपूर, विकी कौशल, मलायका अरोरा यांच्यासह अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींना कोरोनाची लागण झाली होती. मात्र, त्यातवर त्यांनी यशस्वीरित्या मात केली आहे.
Raj Thackeray: मनसे अध्यक्ष राज ठाकरे कोरोना पॉझिटिव्ह, आईलाही लागण
मुंबईत कोरोनाची नेमकी स्थिती काय?
दरम्यान, शनिवारी मुंबईत कोरोनाचे 301 रुग्ण आढळून आले आहेत. शहरात आतापर्यंत 7,55,632 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यापैकी 16,244 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या कोरोनाचे 3,966 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.
ADVERTISEMENT