ADVERTISEMENT
अभिनेत्री रिद्धी डोग्रा आज ३७वा वाढदिवस साजरा करत आहे.
काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘द मॅरीड वुमन’ वेब सीरिजमुळे रिद्धी चर्चेत होती.
रिद्धी डोग्राबद्दल महत्त्वाचं सांगायचं म्हणजे ती माजी केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांची भाची आहे.
रिद्धीने २००७ मध्ये झूम टिव्हीच्या माध्यमातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं होतं. त्यानंतर तिने ‘राधा की बेटियाँ कुछ कर दिखाएगी’, ‘लागी तुझसे लगन’ यासारख्या लोकप्रिय ठरलेल्या मालिकांमध्ये तिने भूमिका साकारल्या होत्या.
त्याचबरोबर ‘मर्यादा’, ‘आखिर कब तक’, ‘सावित्री’, ‘ये है आशिकी’, ‘दीया और बाती हम’, ‘वो अपना सा’ आदींमध्येही तिने काम केलं आहे.
२०१० मध्ये अभिनेत्री रिद्धी डोग्राची आणि राकेश बापट याची भेट झाली. सोबत काम करत असताना त्यांच्यात मैत्री झाली.
दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले आणि त्यांनी लग्नही केलं होतं.
८ वर्ष सोबत राहिल्यानंतर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला.
२०१९ मध्ये अभिनेत्री रिद्धी डोग्रा आणि राकेश बापटने संयुक्त निवेदनातून घटस्फोट घेत असल्याचं जाहीर केलं होतं.
घटस्फोट घेण्यामागे कोणतंही निश्चित असं कारण नाही. मात्र आम्ही सहमतीने विभक्त होण्याचा निर्णय घेत असल्याचं त्यांनी म्हटलं होतं.
ADVERTISEMENT