दोन दिवसांपूर्वीच अभिनेते विक्रम गोखले यांनी एक वक्तव्य केलं होतं. त्यावरून त्यांच्यावर टीका झाली. अशात आता अभिनेत्री स्वरा भास्करनेही विक्रम गोखलेंवर टीका केली आहे. कंगना रणौतच्या वक्तव्याला पाठिंबा दिला होता. त्यावरून स्वराने आता एक ओळीचं ट्विट करत विक्रम गोखलेंवर टीका केली आहे.
ADVERTISEMENT
काय म्हटलं आहे स्वरा भास्करने?
पद्म पुरस्कार येत आहे असं म्हणत स्वरा भास्करने ANI चं एक ट्विट पोस्ट केलं आहे. ज्या ट्विटमध्ये विक्रम गोखलेंनी कंगनाच्या वक्तव्याला पाठिंबा दिल्याचं म्हटलं होतं.
काय म्हणाले होते विक्रम गोखले?
कंगना रनौत जे म्हणाली आहे की, जे स्वातंत्र्य मिळालं आहे, ते भीक मागून मिळालेलं आहे. त्यावर मी सहमत आहे. हे दिलेलं आहे बरं का? हे ज्या योद्धयांनी मिळविण्याचा प्रयत्न केला. त्यांना फासावर जाताना. मोठंमोठे लोक बघत राहिले, त्यांना वाचविले नाही. आपल्या देशाचे हे लोक ब्रिटिशांच्या विरोधात उभे राहत आहेत. हे बघून सुद्धा त्यांना फाशीपासून वाचवलं नाही. असेही काही लोक आपल्या केंद्रीय राजकारणात होते. भरपूर वाचलेलं आहे.
‘हे विधान म्हणजे स्वातंत्र्य लढ्यात ज्यांनी बलिदान दिलं, त्यांचा अपमान नाही का?’ त्या प्रश्नावर बोलताना विक्रम गोखले म्हणाले, ‘आहेच! पण हे आपण सर्वांनी समजून घेतलं पाहिजे की, आपण म्हणजे कोण, तर आपण सरकार देतो. हा आपला अधिकार आहे. आपण सरकारला जाब विचारलाच पाहिजे की, हे तुम्ही हे काय करत आहात?”, अशी भूमिका त्यांनी कंगना रनौतच्या विधानामुळे निर्माण झालेल्या वादावर मांडली.
कंगना काय म्हणाली होती?
8 नोव्हेंबरला कंगना रणौतला तिच्या चित्रपटातील योगदानाबद्दल पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते कंगनाला हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या पुरस्कार सोहळ्यानंतर कंगनाने ‘टाईम्स नाऊ’ या वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. या मुलाखतीत तिने वादग्रस्त वक्तव्य केले. ‘देशाला १९४७ मध्ये मिळालेले स्वातंत्र्य हे स्वांतत्र्य नसून ती भीक होती. आपल्याला खरे स्वातंत्र्य हे २०१४ मध्ये मिळाले.’
ADVERTISEMENT