पुणे: महाराष्ट्रात सध्याच्या घडीला सर्वाधिक कोरोना (Corona) पॉझिटिव्ह रुग्ण हे पुण्यात आढळत आहेत. पुणे (Pune) हे महाराष्ट्रातच नवे तर देशातील सर्वात जास्त रुग्ण सापडणारं शहर ठरलं आहे. त्यामुळे येथील परिस्थिती ही दिवसेंदिवस भयंकर होत चालली आहे. अशावेळी आता अभिनेत्री उर्मिला मातोंडकर (Urmila Matondkar) ही पुणेकरांच्या मदतीला धावून आली आहे. सध्याच्या या कठीण काळात एखादी छोटीशी मदत देखील कोरोना रुग्णांसाठी फारच महत्त्वाची ठरते आहे. अशी एक छोटी मदत (Help) आता उर्मिला मातोंडकरने केली आहे.
ADVERTISEMENT
कोरोना रुग्णांना सध्या रुग्णालयात बेड, ऑक्सिजन आणि औषधं मिळवणं हे खूपच कठीण होऊन बसलं आहे. त्यामुळे अनेकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. अशावेळी पुण्यातील आरोग्य व्यवस्थेवर देखील प्रचंड ताण आहे त्यामुळेच नागरिकांना योग्य ती मदत मिळावी यासाठी उर्मिला मातोंडकर हिने एक ट्विट केलं असून यामध्ये तिने पुणे शहराकरता कोरोना संदर्भातील महत्त्वाचे फोन नंबर शेअर केले आहेत.
‘या’ 5 वेबसाइट्स कोविड रूग्णांसाठी ऑक्सिजन, बेड्स, औषध मिळवून देण्यात करतील मोठी मदत
पाहा पुणे शहरासाठी कोरोना संदर्भातील महत्त्वाचे फोन नंबर:
-
कोव्हिड हेल्पलाइन – 020-67801500/ 020-25502110 (हेल्पलाइन नंबर)
-
रुग्णवाहिका – 9689939381/ 108
-
पुणे कंट्रोल रुम – 020-26127394
-
पुणे झेडपी कंट्रोल रुम – 020-26138082
-
पीसीएमसी कंट्रोल रुम – 020-67331151/ 020-67331152
-
कोव्हिड हेल्पलाइन (शववाहिनी) – 9689939628/ 020-24503211/24503212
कोरोनाशी संबंधित पुण्यातील रुग्णांना ज्या काही अडचणी असतील त्या अडचणी ते या हेल्पलाइनच्या माध्यमातून मांडू शकतात.
Corona च्या तिसऱ्या लाटेला तोंड देण्यासाठी महाराष्ट्राची तयारी सुरू-राजेश टोपे
पुण्यातील कोरोना रुग्णसंख्या
पुण्यात आतापर्यंत तब्बल 8,33,243 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. ज्यापैकी तब्बल 9438 जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. तर सध्याच्या घडीला पुण्यात सर्वाधिक 1 लाख 45 हजार 529 कोरोनाबाधित रुग्ण आहेत.
गेल्या 24 तासात पुण्यात तब्बल 9429 नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. तर 130 कोरोना रुग्ण दगावले आहेत.
मागील 24 तासातील महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची आकडेवारी
महाराष्ट्रात मागील 24 तासात 66 हजार 159 नवे कोरोना रूग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. तर 771 मृत्यूंची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यूदर 1.5 टक्के इतका झाला आहे. महाराष्ट्रात गेल्या 24 तासात 68 हजार 537 रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यात आत्तापर्यंत एकूण 37 लाख 99 हजार 266 रूग्ण बरे झाले आहेत. राज्यातील रूग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट 83.69 टक्के एवढा झाला आहे.
आतापर्यंत तपासण्यात आलेल्या 2 कोटी 68 लाख 16 हजार 75 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 45 लाख 39 हजार 553 चाचणीचे नमुने हे पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात आज घडीला 6 लाख 70 हजार 301 रूग्ण अॅक्टिव्ह आहेत.
ADVERTISEMENT