Gautam Adani : अदानी कंपन्यांचे शेअर्स पुन्हा तेजीत, महत्त्वाचं कारण आलं समोर…

मुंबई तक

05 Mar 2023 (अपडेटेड: 26 Mar 2023, 05:00 PM)

Gautam Adani Shares Recover : देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपती गौतम अदानी (gautam adani) यांच्याविरोधात अमेरिकन रिचर्स फर्म कंपनी हिंडेनबर्गने (Hindenburg)गेल्या काही आठवड्यांपुर्वीच संशोधन अहवाल प्रकाशित केला होता. या अहवालानंतर गौतम अदानीच्या शेअर्स आणि कमाईत मोठी घसरण झाली होती. त्याचसोबत जगातील सर्वांत श्रीमंताच्या यादीतल स्थान देखील त्यांनी गमावलं होते. त्यामुळे गौतम अदानी यांना मोठा धक्का बसला […]

Mumbaitak
follow google news

Gautam Adani Shares Recover : देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपती गौतम अदानी (gautam adani) यांच्याविरोधात अमेरिकन रिचर्स फर्म कंपनी हिंडेनबर्गने (Hindenburg)गेल्या काही आठवड्यांपुर्वीच संशोधन अहवाल प्रकाशित केला होता. या अहवालानंतर गौतम अदानीच्या शेअर्स आणि कमाईत मोठी घसरण झाली होती. त्याचसोबत जगातील सर्वांत श्रीमंताच्या यादीतल स्थान देखील त्यांनी गमावलं होते. त्यामुळे गौतम अदानी यांना मोठा धक्का बसला होता. या घटनेतून सावरत आता गौतम अदानी पुन्हा एकदा उभे राहत आहेत. अदानींच्या शेअर्समध्ये (Adani Shares)पुन्हा तेजी आली आहे. अदानींना सावरवण्यात एका व्यक्तींने मोलाची भूमिका बजावली आहे.हा व्यक्ती नेमका कोण आहे? हे जाणून घेऊयात. (adani group shares recover after hindenburg report rajiv jain investing)

हे वाचलं का?

‘हे’ शेअर्स तेजाळले?

हिंडेनबर्गच्या (Hindenburg) झटक्यानंतर हळूहळू गौतम अदानीचे (gautam adani)शेअर्स सावरत आहेत. गेल्या चार दिवसांपासून अदानींच्या शेअर्समध्ये तेजी दिसून आली आहे. शुक्रवारी 4 मार्चला दुपारी अदानी समुहाची फ्लॅगशिप कंपनी अदानी एंटरप्राईसेसच्या शेअर्स 18 टक्क्याने तेजाळले आणि कंपनीचे शेअर्स 1892 रूपयावर पोहोचले. यासोबतच अदानी एंटरप्राईजेसचा स्टॉकने 1017.10 रूपयांच्या 52 आठवड्यांच्या नीचांकी पातळीवरून जवळपास 80 टक्के रिकव्हरी दर्शवली.

अदानी कंपनीचे (Adani Shares) दुसरे शेअर्स अदानी पावर, अदानी ट्रांसमिशन,अदानी टोटल गॅस, अदानी ग्रीन एनर्जी, अदानी विल्मर आणि एनडीटीव्हीचे शेअर 5 टक्क्यांच्या वरच्या सर्किटमध्ये आहेत. अदानी पोर्टस, अंबूजा सिमेंट आणि एसीसी लिमिटेडच्या शेअरमध्येही तेजी आली. त्यामुळे अनेकांना प्रश्न पडलाय की, अदानी समुहाच्या शेअर्समध्ये तेजी येण्याचे कारण काय?

पवार, ठाकरेंसह 9 विरोधी नेत्यांचं मोदींना पत्र; राणेंचा उल्लेख, गंभीर आरोप

शेअर्स तेजीत येण्याचे कारण काय?

अदानी शेअर्समध्ये (Adani Shares) तेजी येण्याचे कारण कंपनीतील ब्लॉक डिल आहे. अमेरीकन इन्वेस्टमेंट फर्म GQG पार्टनर्सने अदानी समुहाच्या चार कंपन्यांमध्ये 15,446 करोड रूपयांची गुंतवणूक केली आहे. 2 मार्चला या शेअरची खरेदी केली गेली होती. या कंपनीचे चेअरमन भारतीय वंशाचे राजीव जैन आहेत. राजीव जैन यांनी 2016 मध्ये GQG पार्टनर्सची सुरुवात केली होती. ही फर्म ऑस्ट्रेलियामध्ये सुचीबद्ध आहे.

GQG पार्टनर्सने अदानी एंटरप्रायझेस, अदानी पोर्टस आणि स्पेशल इकॉनॉमिक झोन, अदानी ट्रांसमिशन आणि अदानी ग्रीन एनर्जी सोबत अनेक विविध कंपन्यांमध्ये 2.5 टक्के ते 4.1 टक्क्यांच्या दरम्यान स्टेक घेतला. दुसरे कारण म्हणजे गुंतवणूकदार आणि कर्जदारांचा विश्वास जिंकण्यासाठी अदानी समूह सातत्याने विविध उपाययोजना करत आहे.

रॉयर्टर्सच्या वृत्तानुसार, अदानी समूह गुंतवणूकदारांचा विश्वास जिंकण्यासाठी सिंगापूर आणि हॉंगकॉंगमध्ये रोड शो करत आहेत. या रोडशोमधून त्यांनी गुंतवणूकदारांना विश्वास जिंकण्याचा प्रयत्न केला. तसेच त्याच्याकडे पैशाचा काहीच तुडवडा नाही आहे. आणि तो त्याच्यावरील कर्ज सहज चुकते करू शकता, हे पटवून देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांचा पुन्हा एकदा त्यांच्यावर विश्वास बसला आहे.

गेल्या चार सत्रात शेयर्समध्ये तेजी आल्यानंतर अदानी समूहाच्या कंपन्यांचे एकूण बाजारमुल्य सुमारे 1 लाख कोटी रूपयांनी वाढले आहे. शेअर्समधून बंपर रिकव्हरी केल्यानंतर गौतम अदानीच्या संपत्तीच्या मालमत्तेत खुप वाढ झाली आहे. गौतम अदानी जगभरातील 30 सर्वांत श्रीमंत उद्योगपतीच्या पक्तीत जाऊन बसले आहेत.

पवार, ठाकरेंसह 9 विरोधी नेत्यांचं मोदींना पत्र; राणेंचा उल्लेख, गंभीर आरोप

हिडेनबर्गचे आरोप काय?

हिंडेनबर्गने (Hindenburg)अदानी समुहावर अनेक गंभीर आरोप केले आहेच. हिंडेनबर्गने आपल्या अहवालात म्हटले आहे की, अदानी समूह अनेक दशकांपासून आपल्या कंपन्याच्या शेअर्समध्ये फेरफार करत आहे. अदानी समुहाचा मनी लॉड्रिंगमध्ये सहभाग असल्याचा दावा हिडेनबर्गने केला आहे. अदानी समुहातील 7 कंपन्यांच्या शेअर्सचे मूल्य 85 टक्क्यांहून अधिक आहे. याशिवाय अदानी समूहावर 2.20 लाख कोटी रूपयांचे मोठे कर्ज आहे. हे समुहापेक्षाही जास्त असल्याचा दावा हिडेनबर्गचा आहे.

    follow whatsapp