ADVERTISEMENT
सुप्रसिद्ध गायक अदनान सामी त्याच्या दमदार हिट गाण्यांसाठी नेहमीच ओळखला जातो.
एकेकाळी अदनान सामीचं वजन 250 किलो होते, यानंतर त्याने काही वर्षांपूर्वी 130 किलो वजन कमी केले होते.
अदनान सामीचं हे ट्रान्सफॉर्मेशन पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटले. वजन कमी झाल्यानंतर जेव्हा तो दिसला तेव्हा त्याला ओळखणं कठीण होते.
अदनानने एका मुलाखतीदरम्यान सांगितले होते की, त्याचे वजन कसे कमी झाले?
अदनान म्हणाला, ‘माझे वडील मला एकदा म्हणाले माझ्यावर तुझे अंत्यसंस्कार करण्याची वेळ येऊन देऊ नको. कारण त्यांना वाटत होते की माझ्या वाढलेल्या वजनामुळे मी लवकरच मरेन.’
‘मी नियमित तपासणीसाठी माझ्या डॉक्टरांकडे गेलो, त्यांनी मला 6 महिने दिले आणि सांगितले की जर मी माझी लाइफस्टाइल बदलली नाही तर मी मरेन.’
यानंतर माझ्या वडिलांनी मला विनंती केली आणि मी माझी लाइफस्टाइल बदलण्याचा निर्णय घेतला.
अदनानने सांगितले, ‘वजन कमी करण्यासाठी मी मेहनत, जिद्द आणि लाइफस्टाइलमधील बदलांमुळे माझे वजन कमी केले आहे.’
अदनानला एक चांगला डाएटिशियन भेटला आणि 6-7 महिने त्याने केवळ स्वतःवर लक्ष केंद्रित केले.
लोक त्याच्याकडे पाहून थट्टा करायचे, पण स्वत:ला मानसिकदृष्ट्या मजबूत बनवून त्याने वजन कमी केले.
मानसिकदृष्ट्या मजबूत झाल्यामुळे अदनानचा आत्मविश्वास वाढला आणि त्याला लक्ष केंद्रित करण्यास मदत मिळाली. ज्यामुळे त्याचे वजन सहज कमी झाले.
ADVERTISEMENT