देशभरात कोरोनाची दुसरी लाट (Second Wave) आली आहे. या लाटेने हाहाकार माजवला आहे हे आपण वाढत्या रूग्णसंख्येरून आणि मृत्यूंवरून लक्षात येतंच आहे. देशाचा कोरोना रूग्णवाढीचा दर म्हणजेच टेस्ट पॉझिटिव्हिटी रेट हा 20 टक्क्यांहून जास्त आहे. टेस्टिंग, ट्रॅकिंग, ट्रेसिंग हे तीन मुद्दे महत्त्वाचे आहेत. तसंच आयसोलेशन आणि होम क्वारंटाईन रूग्णांसाठी ट्रिटमेंटही महत्त्वाची आहे. देशात रोज सरासरी 15 लाख चाचण्या केल्या जात आहेत. अशात ICMR म्हणजेच भारतीय आयुर्विज्ञान परिषदने काही महत्त्वाच्या सूचना जारी केल्या आहेत.
ADVERTISEMENT
Corona चाचण्या प्रत्येक राज्याने ७० टक्क्यांहून अधिक कराव्यात, MHA च्या नव्या गाईडलाईन्स
RTPCR चाचण्यांसंदर्भात ICMR ने काय सूचना केल्या आहेत?
RTPCR चाचणीमध्ये जर एखादा रूग्ण पॉझिटिव्ह आला आहे तर त्याची RAT किंवा RTPCR चाचणी पुन्हा पुन्हा करू नये.
जो रूग्ण कोव्हिड मधून बरा होईल त्याची रूग्णालयातून डिस्चार्ज मिळताना चाचणी करू नये, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने दिलेल्या गाईडलाईन्सचं पालन करावं
प्रयोगशाळांवर आलेला ताण कमी करण्यासाठी जे सृदृढ लोक आहेत त्यांना देशांतर्गत प्रवासासाठी किंवा जिल्हातंर्गत प्रवासासाठी RTPCR चाचणी करावी लागू नये याचा विचार होतो आहे.
ज्यांची अत्यावश्यक गरज नाही आणि ज्यांना कोरोना सदृश लक्षणं आहेत त्यांनी प्रवास करू नये, जेणेकरून कोरोनाचा संसर्ग वाढणार नाही
लक्षणं नसलेल्या लोकांनी त्यांच्या अत्यावश्यक गरजांसाठी प्रवास करताना कोरोना प्रतिबंधाचे सगळे नियम पाळणं आवश्यक आहे
मोबाईल लॅब आता GeM च्या पोर्टलवर उपलब्ध आहेत.
RAT अर्थात रॅपिड अँटिजेन टेस्ट कोव्हिडच्या चाचणीसाठी जून 2020 पासून सुरू कऱण्यात आली आहे. या टेस्टमुळे 15 ते 20 रूग्ण पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे ते समजण्यास मदत होते. कोरोनाची चाचणी तातडीने करण्यासाठी या चाचणीचा उपयोग होतो.
राज्यात कोरोना रुग्णांचे मृत्यू का वाढताहेत?
RAT चाचण्यांसंदर्भात ICMR ने काय सूचना केल्या आहेत?
RAT चाचणी ही आता सर्व सरकारी आणि खासगी आरोग्यसंस्थांमध्ये सुरू करण्याचा विचार होतो आहे.
खेड्यांमध्ये आणि शहरांमध्ये RAT चाचणी करण्यासाठीचे विविध बुथ उभे केले जाणार आहेत
विविध कार्यालयं, शाळा, महाविद्यालयं, धार्मिक केंद्रं या ठिकाणी आरोग्य सुविधा आणि RAT साठीचे बुथ उभे करण्याचा विचार सुरू आहे
आणखी काय म्हटलं आहे ICMR ने ?
खासगी आणि सरकारी प्रयोगशाळांमध्ये टेस्टिंग कपॅसिटी वाढवली पाहिजे
RAT टेस्टिंगसाठीची ICMR च्या सर्व सूचना या www.icmr.gov.in/pdf/covid/startegy वर उपलब्ध आहे.
RTPCR आणि RAT चाचण्यांचे रिझल्ट्स हे ICMR च्या पोर्टलवर अपलोड केले जातात.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत जर कुणालाही ताप, सर्दी, डोकेदुखी, खोकला, अंगदुखी, श्वास घ्यायला त्रास होणं, घसा दुखणे, खवखवणे, चव जाणे, वास जाणे, अतिसार होणे ही काही लक्षणं दिसली तर लोकांनी काळजी घ्यावी आणि चाचणी करून घ्यावी.
ADVERTISEMENT