Deven Bharti ची नियुक्ती! फडणवीसांच्या निर्णयाचे माजी पोलीस आयुक्तांनी सांगितले धोके

मुंबई तक

08 Jan 2023 (अपडेटेड: 02 Mar 2023, 09:26 AM)

मुंबई : पोलीस दलातील विशेष पोलीस आयुक्तपदावरुन सुरु झालेला वाद अद्याप कायम आहे. या पदावर उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मर्जीतले समजले जाणारे वरिष्ठ पोलीस अधिकारी देवेन भारती (IPS Deven Bharti) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीवर काँग्रेससह विरोधी पक्षांनी तीव्र आक्षेप घेतला आहे. महाराष्ट्राच्या प्रशासकीय व्यवस्थेचा सत्यानाश करण्याचा चंगच शिंदे-फडणवीसांनी बांधला आहे, […]

Mumbaitak
follow google news

मुंबई : पोलीस दलातील विशेष पोलीस आयुक्तपदावरुन सुरु झालेला वाद अद्याप कायम आहे. या पदावर उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मर्जीतले समजले जाणारे वरिष्ठ पोलीस अधिकारी देवेन भारती (IPS Deven Bharti) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीवर काँग्रेससह विरोधी पक्षांनी तीव्र आक्षेप घेतला आहे. महाराष्ट्राच्या प्रशासकीय व्यवस्थेचा सत्यानाश करण्याचा चंगच शिंदे-फडणवीसांनी बांधला आहे, अशी टीका या निर्णयावरुन करण्यात येत आहे.

हे वाचलं का?

राजकीय टिकेपाठोपाठ प्रशासकीय व्यवस्थेमधूनही देवेन भारती यांच्या नियुक्तीवर टीका होऊ लागली आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त ज्युलिओ रिबेरो यांनी या निर्णयावर टीका करताना एक प्रकारे पोलीस दलाच्या मनोधैर्यावर चिंता व्यक्त केली आहे. २ सत्ताकेंद्रे निर्माण झाल्यास सुशासन साधता येणार नाही आणि एखाद्या विषयावर जर दोन अतिवरिष्ठ अधिकारी असहमत असतील तर समस्या नक्कीच निर्माण होतील. असं सातत्याने होऊ लागलं तर ते कामकाजावर दुष्परिणाम करणारे ठरेल आणि पोलीस खात्यात वरपासून खालपर्यंत सगळ्यांचचं मनोधैर्य कायमचं खचेल, अशी चिंता रिबेरो यांनी व्यक्त केली आहे.

‘लोकसत्ता’ वृत्तपत्रात लिहिलेल्या एका विशेष लेखामध्ये रिबेरो यांनी याबद्दल आपलं मत व्यक्त केलं आहे.

Mumbai Police: विवेक फणसळकरांचं पद मोठं की देवेन भारतींचं?

‘फडणवीसांचे विश्वासू हेच मुख्य कारण’

लेखामध्ये रिबेरो म्हणाले, मी सर्वप्रथम हे स्पष्ट करतो, की मी देवेन भारतींचा अजिबात विरोधक नाही. ते देवेंद्र फडणवीसांच्या विश्वासातील आहेत हे वास्तव आहे. देवेन भारतींना मुंबईच्या पोलीस आयुक्तालयात स्थान मिळण्यामागे हेच मुख्य कारण आहे, असं मला वाटतं. सत्ताधारी राजकारणी आपला दबदबा सिद्ध करण्यासाठी असं करत असतात. त्याच वेळी ठरावीक नोकरशहा आणि पोलीस अधिकाऱ्यांना ते आपल्या विश्वासू वर्तुळात समाविष्ट करून घेतात.

तर पोलीस खात्यात सगळ्यांच मनोधैर्य खचेल -ज्युलिओ रिबेरो

मुंबई पोलीस दलात दोन सत्ताकेंद्रे निर्माण झाल्यास सुशासन साधता येणार नाही. एखाद्या विषयावर जर दोन अतिवरिष्ठ अधिकारी असहमत असतील तर समस्या नक्कीच निर्माण होतील. असं जर सातत्याने होऊ लागलं तर ते कामकाजावर दुष्परिणाम करणारे ठरेल आणि पोलीस खात्यात वरपासून खालपर्यंत सगळ्यांचचं मनोधैर्य कायमचं खचेल. गृह खाते सांभाळणाऱ्या उपमुख्यमंत्र्यांच्या मर्जीतील असलेल्या आणि त्यांचा अतीव विश्वास लाभलेल्या व्यक्तीच्या या समांतर अधिकारीपदावरील नियुक्तीमुळे मुंबईकरांच्या मनात भयसूचक भावना निर्माण झाली आहे, अशी चिंताही रिबेरो यांनी व्यक्त केली.

‘सिंघम’वरुन मुंबई पोलिसात नवं राजकारण, देवेन भारतींनी स्पष्ट केले इरादे

देवेन भारती आणि रश्मी शुक्लांवर फडणवीसांची विशेष मर्जी

आपल्या मर्जीतील व्यक्तीसाठी पद निर्माण करून फडणवीसांनी विरोधकांना त्यांच्यावर टीका करण्यास संधी उपलब्ध करून दिली आहे. बहुतांश विद्यमान आणि निवृत्त पोलीस अधिकाऱ्यांना असं वाटतं, की फडणवीस हे देवेन भारती आणि नव्या जबाबदारीच्या प्रतीक्षेतील रश्मी शुक्ला यांच्यावर विशेष मर्जी राखून आहेत. हे दोन्ही अधिकारी आपापल्या परीने पुरेसे सक्षम आहेत. मात्र, त्यांना देण्यात येत असलेले विशेष प्राधान्यामुळे वातावरण गढुळलं आहे.

पोलीस महासंचालकांनी द्यायला हवा होता प्रस्ताव

प्रचलित संकेतानुसार राज्याच्या पोलीस महासंचालकांनी हा प्रस्ताव द्यायला हवा होता, असं मत रिबेरो यांनी लोकसत्ताला लिहिलेल्या लेखामध्ये व्यक्त केलं आहे.ते म्हणाले, पोलीस आयुक्त आणि सह पोलीस आयुक्त यांच्यातील दुवा असणाऱ्या पदश्रेणीची गरज जनतेसह पोलीस दलाला समजावून सांगून त्यांची मान्यता घेणे आवश्यक होते. विशेष आयुक्त हे आयुक्तांना बांधील असतील असे फडणवीसांनी स्पष्ट केले, परंतु देवेन भारती यांच्याखेरीज अन्य विशेष आयुक्त असते तर या खुलाशावर विश्वास ठेवता आला असता.

Mumbai Police दलातील ऐतिहासिक नियुक्ती, देवेन भारतींवर मोठी जबाबदारी

‘ते’ फडणवीसांच्या हिताचे

यावेळी रिबेरो यांनी फडणवीस यांना संशयाचं धुके लवकरात लवकर हटविण्याचा सल्ला दिला. पोलीस अधिकारी तसेच पोलीस दलाशी संबंधित असलेल्या राजकीय अडचणींवर मात करण्यासाठी फडणवीसांना आयुक्तालयात विश्वासू माणसाची गरज असल्याचे पोलीस दलात बोलले जाते. यासाठीच देवेन भारती यांची निवड फडणवीस यांनी केली आहे. मात्र, संशयाचे हे धुके फडणवीस जेवढय़ा लवकर हटवतील तितके हितावह आहे.

    follow whatsapp