ADVERTISEMENT
पंतप्रधान मोदींनी युनोमधील भाषणात अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं आहे. जाणून घ्या त्यातील दहा महत्त्वाचे मुद्दे
1. सर्व समावेशी विकास आणि 50 कोटीहून अधिक लोकांना मोफत औषधोपचार यावर केली चर्चा
2. प्रदूषित पाण्याच्या समस्येपासून सुटका मिळावी यासाठी सरकारकडून सुरु असलेल्या अभियानाबाबतही दिली माहिती.
3. जगातील प्रत्येक सहावा नागरिक भारतीय असून जेव्हा भारतीयांची प्रगती होते तेव्हा जगातील विकासाला देखील गती मिळते.
4. पंतप्रधान मोदींनी यावेळी जगभरातील लस निर्मात्यांना भारतात येऊन लस निर्मितीचं आवाहन दिलं आहे.
5. भारताने पहिली DNA लस विकसित केली होती जी 12 वर्षावरील मुलांना देत येईल. अशी माहितीही पंतप्रधान मोदींनी दिली.
6. शास्त्रज्ञ कोरोनाची एक नेझल लस देखील तयार करण्याचा प्रयत्न करत असल्याचंही पंतप्रधान मोदी म्हणाले.
7. पंतप्रधान मोदींनी यावेळी पाकिस्तानला देखील सुनावलं आहे. यावेळी त्यांनी पाकला दहशतवादाचा आधार घेऊ नका असा सल्लाही दिला.
8. काही देश दहशतवादाला ‘पॉलिटिकल टूल’ म्हणून वापरत आहेत. पण त्यांना देखील या दहशतवादाचा धोका आहे असंही यावेळी मोदी म्हणाले.
9. अफगाणिस्तानच्या धरतीचा दहशतवादासाठी वापर होऊ देऊ नका असं आवाहनही यावेळी पंतप्रधान मोदींनी जगाला केलं आहे.
10. समुद्र हे आंतरराष्ट्रीय व्यापाराची लाइफलाइन आहे. त्यामुळे त्याचा चांगला वापर करा ते खराब करु नका असाही सल्ला त्यांनी दिला.
ADVERTISEMENT