Shraddha Murder: तीनवेळा झालं होतं आफताब आणि श्रद्धाचं ब्रेकअप, त्यावेळीही करायचा मारहाण

मुंबई तक

22 Nov 2022 (अपडेटेड: 01 Mar 2023, 09:02 AM)

Shraddha Murder Case : श्रद्धा हत्याकांडात पोलिसांचा तपास जसा जसा पुढे सरकतो आहे तशाच प्रकारे श्रद्धा आणि आफताब पूनावाला यांच्याबाबतच्या गोष्टी समोर आल्या आहेत. काही गोष्टी धक्कादायक आहेत ज्या समोर येत आहेत. आफताबने पोलिसांना नुकतंच हे सांगितलं आहे की श्रद्धाचं आणि त्याचं एकदा नाही दोनदा नाही तर तीनवेळा ब्रेक अप झालं होतं. ब्रेकपच्या दरम्यानही श्रद्धाला […]

Mumbaitak
follow google news

Shraddha Murder Case : श्रद्धा हत्याकांडात पोलिसांचा तपास जसा जसा पुढे सरकतो आहे तशाच प्रकारे श्रद्धा आणि आफताब पूनावाला यांच्याबाबतच्या गोष्टी समोर आल्या आहेत. काही गोष्टी धक्कादायक आहेत ज्या समोर येत आहेत. आफताबने पोलिसांना नुकतंच हे सांगितलं आहे की श्रद्धाचं आणि त्याचं एकदा नाही दोनदा नाही तर तीनवेळा ब्रेक अप झालं होतं.

हे वाचलं का?

ब्रेकपच्या दरम्यानही श्रद्धाला मारहाण करत होता आफताब

समोर आलेल्या माहितीनुसार हेदेखील कळलं आहे की ब्रेकअप झालेलं असूनही श्रद्धाला आफताब मारहाण करत होता. श्रद्धा मारहाण झाल्यावर रडायची तिला रडत, कण्हत ठेवून आफताब निघून जायचा. त्यानंतर त्याचं डोकं ठिकाणावर आलं की श्रद्धाला इमोशनल ब्लॅकमेल करून गयावया करायचा आणि मग ती त्याला माफ करायची.

Shraddha Murder: एक होती श्रद्धा वालकर! प्रेमाच्या ३५ तुकड्यांची आक्रंदणारी कहाणी

टेलिव्हिजन स्टार इमरान नजीर खानने काय सांगितलं?

टीव्ही स्टार इमरान नजीर खानने ही माहिती दिली की कोव्हिडनंतर एक इव्हेंट होता. त्या इव्हेंटनंतर एक क्लिनिंग कँपेन आयोजित करण्यात आलं होतं. त्यावेळी श्रद्धाची आण माझी ओळख झाली होती. श्रद्धा त्यावेळी काहीशी त्रासलेली दिसत होती. त्यामुळे इमरान नजीर खानने तिला काय झालं आहे ते विचारलं? त्यावेळी श्रद्धाने त्याला सांगितलं की माझा प्रियकर (आफताब) स्मोकिंग करतो आणि दारू पितो. त्यानंतर श्रद्धा आणि माझं काही फारसं बोलणं झालं नाही. तिच्या मृत्यूची बातमी आली त्यावेळी मला हे आठवलं असंही इमरान नजीर खानने सांगितलं.

१८ मे २०२२ ला काय घडलं होतं?

१८ मे २०२२ ला श्रद्धा आणि आफताब या दोघांमध्ये मोठं भांडण झालं. त्यानंतर या दोघांचा आवाज वाढला त्यावेळी श्रद्धा जोरजोरात ओरडू लागली. त्यावेळी आफताबने तिचं तोंड दाबलं आणि गळा आवळून तिची हत्या केली. तिची हत्या केल्यानंतर आफताबने तिचा मृतदेह बाथरूममध्ये ठेवला होता.

श्रद्धाच्या मृतदेहाची विल्हेवाट कशी लावायची यासाठी त्याने गुगल सर्च केलं. गुगलवर त्याला हे सापडलं की माणसाच्या शरीराचे तुकडे कसे करायचे. यानंतर तो बाजारात जाऊन फ्रिज घेऊन आला. श्रद्धाच्या म़ृतदेहाचे ३५ तुकडे केले आणि ते फ्रिजमध्ये ठेवले. त्यानंतर तो रोज फ्रिजमधले काही तुकडे काढून पॉलिथिनमध्ये पॅक करत होता आणि महरौलीच्या जंगलात फेकून यायचा. पोलिसांना त्याने ही माहिती दिली. पोलिसांनी या ठिकाणी त्याला घेऊन शोध केल्यानंतर आत्तापर्यंत त्यांना १३ तुकडे मिळाले आहेत. तर हाडंही अनेक भागांमध्ये मिळाली आहेत.

डेक्स्टर ही वेबसीरिजही आफताबने पाहिली होती

डेक्स्टर ही वेबसीरिजही आफताबने पाहिली होती. श्रद्धाची हत्या करून तिच्या मृतदेहाचे तुकडे करण्याची आयडिया त्याला याच वेब सीरिजमध्ये मिळाली. पोलिसांनी हेदेखील सांगितलं की आफताबच्या आयुष्यात अनेक मुली होत्या. त्यामुळे श्रद्धा आणि आफताबमध्ये खटके उडत होते. त्याचा हा कट सहा महिने यशस्वीही ठरला असंही म्हणता येईल पण अखेर प्रेमाच्या ३५ तुकड्यांना वाचा फुटलीच.

    follow whatsapp