आमिर खानच्या संपर्कात आल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनाही करावी लागणार कोरोना टेस्ट

मुंबई तक

• 10:48 AM • 24 Mar 2021

बॉलिवूड स्टार आमिर खानला कोरोनाची लागण झाल्यामुळे मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंच्या चिंतेत वाढ झाली आहे. आमिर खान दोनच दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंच्या शासकीय निवासस्थानी म्हणजेच एका कार्यक्रमानिमित्त गेला होता. या कार्यक्रमात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि आमिर खान शेजारीच बसले होते. जवळपास तासभर सुरू असलेल्या या कार्यक्रमात मुख्यमंत्री आमिर खानच्या संपर्कात आल्याने सावधगिरी म्हणून मुख्यमंत्री उध्दव ठाकरे […]

Mumbaitak
follow google news

बॉलिवूड स्टार आमिर खानला कोरोनाची लागण झाल्यामुळे मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंच्या चिंतेत वाढ झाली आहे. आमिर खान दोनच दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंच्या शासकीय निवासस्थानी म्हणजेच एका कार्यक्रमानिमित्त गेला होता. या कार्यक्रमात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि आमिर खान शेजारीच बसले होते. जवळपास तासभर सुरू असलेल्या या कार्यक्रमात मुख्यमंत्री आमिर खानच्या संपर्कात आल्याने सावधगिरी म्हणून मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना कोरोनाची टेस्ट करणे क्रमप्राप्त ठरणार आहे.

हे वाचलं का?

मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंच्या घरी कोरोनाने याआधीच एंट्री घेतली आहे. आदित्य ठाकरे आणि उध्दव ठाकरेंच्या पत्नी रश्मी ठाकरे यांना याआधीच कोरोनाची लागण झाली आहे. त्यातच भर पडली ती आमिर खान दोनच दिवसांपूर्वी उध्दव ठाकरेंच्या संपर्कात आल्याची त्यामुळे उध्दव ठाकरेंना तातडीने सावधगिरी म्हणून कोरोना टेस्ट करावी लागणार आहे.

तत्पूर्वी आमिर खानला कोरोनाची लागण झाल्यानंतर त्याच्या प्रवक्त्याने माहिती दिली की आमिर खानला करोनाचा संसर्ग झाला आहे. तो आता होम क्वारंटाइनमध्ये असून, त्याची प्रकृती उत्तम आहे. तसेच सर्व नियमांचं पालन करत आहे. आमिर खानच्या संपर्कात आलेल्या सर्वांनी खबरदारीचा उपाय म्हणून चाचणी करून घ्यावी.

    follow whatsapp