मुलगी झाली म्हणून घोड्यावरून वाटली 50 किलो जिलेबी, बीडमधल्या उपक्रमाचं कौतुक

मुंबई तक

• 10:49 AM • 24 Mar 2022

रोहिदास हातागळे, प्रतिनिधी, बीड मुलगी झाली म्हणून घोड्यावरून 50 किलो जिलेबी वाटत संपूर्ण गावात आनंद व्यक्त करण्यात आला आहे. बीड जिल्ह्यातील मस्साजोग या ठिकाणी मोरे कुटुंबानी केलेल्या या उपक्रमाचं कौतुक संपूर्ण जिल्ह्यात होतं आहे. पूर्वीच्या काळी राजे महाराजेंच्या राजवाड्यात किंवा राजमहालात किंवा त्यानंतरच्या काळात पोलीस पाटील यांच्या घरात एखादं नवीन जर चांगलं काही घडलं की […]

Mumbaitak
follow google news

रोहिदास हातागळे, प्रतिनिधी, बीड

हे वाचलं का?

मुलगी झाली म्हणून घोड्यावरून 50 किलो जिलेबी वाटत संपूर्ण गावात आनंद व्यक्त करण्यात आला आहे. बीड जिल्ह्यातील मस्साजोग या ठिकाणी मोरे कुटुंबानी केलेल्या या उपक्रमाचं कौतुक संपूर्ण जिल्ह्यात होतं आहे.

पूर्वीच्या काळी राजे महाराजेंच्या राजवाड्यात किंवा राजमहालात किंवा त्यानंतरच्या काळात पोलीस पाटील यांच्या घरात एखादं नवीन जर चांगलं काही घडलं की जाती भेद न करता संपूर्ण गावातील आठरा पगड जातीतील लोकांना एकत्र बोलवून त्यांना छोटी मोठी भेट वस्तू आणि गोड जेवण देऊन राजा महाराजे आपला आनंद मोठ्या उत्सवात साजरा करत होते.तीच जुनी रित जोपासुन बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील मोरे कुटुंबातील एका पट्याने आपल्या भावाला मुलगी झाली म्हणून चक्क संपूर्ण गावात हलगीच्या तालावर नाचुन आणि हलगी वाजवत चक्क संपूर्ण गावात जिलेबी वाटली आहे.

जिलेबी वाटप करत असता त्याला गावातील लोकांनी विचारले अहो मोरे आज एवढे आनंदात येऊन वाजत गाजत घोड्यावर बसून जिलेबीचे वाटप कसं काय, काय विचारता? तर मोरे आनंदमयी होऊन मोठ्या आवाजात ओरडून हसत हसत म्हणाले, अहो मुलगी झाली. आमच्या भावांची आणि मोरे कुटुंबाची इच्छा पूर्ण झाली, म्हणून संपूर्ण गावातील लोकांना जिलेबी वाटप करत आहे.

केज तालुक्यातील मस्साजोग येथील प्रितम बुवासाहेब मोरे या पट्याने आपला भाऊ अमर बुवासाहेब मोरे याला कन्यारत्न प्राप्त झाले. म्हणून चक्क पन्नास किलो जिलेबी विकत आणून संपूर्ण गावातील लोकांच्या दारोदारी हलगी वाजवत आणि चक्क घोड्यावर बसून जाऊन चक्क पन्नास किलो जिलेबी वाटप करून आनंद उत्सव साजरा करून गावांमध्ये पुर्व कालीन एक आगळा वेगळा आदर्श निर्माण केला आहे. बीड हा एके काळी असा जिल्हा होता जिथे मुलींच्या जन्मदराचं प्रमाण कमी झालं होतं. आता मात्र मुलगी झाल्यानंतर घोड्यावरून जिलेबी वाटत आनंद साजरा करण्यात येतो आहे.

    follow whatsapp