मुंबई: ‘आम्हाला सगळं माहिती आहे. फार तर फार काय कराल तुरुंगात टाकलं ना..तुरुंगात जायची तयारी आहे आमची.’ अशी प्रतिक्रिया देत शिवसेना (Shiv Sena) नेते संजय राऊत यांनी भाजपला थेट आव्हान दिलं आहे. शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या लेटरबॉम्बविषयी प्रतिक्रिया देताना संजय राऊतांनी भाजपवर निशाणा साधला आहे.
ADVERTISEMENT
पाहा प्रताप सरनाईकांच्या लेटरबॉम्बबाबत नेमकं काय म्हणाले संजय राऊत
‘प्रताप सरनाईक यांनी पत्र का लिहिलं त्याबाबत आमदारच सांगू शकतात. ते त्रासात आहेत, अडचणीत आहेत आणि त्यांच्या अडचणींचे कारण त्यांनी त्यांच्या पत्रात स्पष्ट केलं आहे. भाजप केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करून विनाकारण त्रास देत आहे. असं पत्रमध्ये स्पष्ट म्हटलं आहे.’
‘या त्रासातून सुटका म्हणून आपण मोदींशी जुळून घ्यावं असं त्यांचं म्हणणं आहे. हे त्यांचं मत झालं. मात्र, पक्षाची भूमिका हे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सगळ्यांशी चर्चा करून ठरवली आहे आणि तेच निर्णय घेण्याचे अधिकारी आहेत.’
Exclusive: CM ठाकरेंना दिलेल्या पत्राआधी सरनाईकांनी केलेलं मोठं वक्तव्य
‘या संकटाची कसा सामना करायचा त्यासाठी सरनाईक यांच्या पाठीशी संपूर्ण शिवसेना पक्ष आहे. समन्वयाचा अभाव आहे असं मला तरी वाटत नाही.’
‘महाविकास आघाडीमध्ये कोणत्याही प्रकारचा संभ्रम नाही. विनाकारण त्रास का होतो याची कारणं सरनाईक यांनी पत्रात दिली आहेत. त्याचा अभ्यास मीडियाने आणि महाविकास आघाडीतील पक्षांनी करायला हवा.’
”लहान तोंडी मोठा घास” घेत सरनाईकांचा लेटरबॉम्ब, वाचा ५ महत्वाचे मुद्दे
‘विनाकारण त्रास याआधी तृणमूल काँग्रेसने अनुभवलेला आहे. महाविकास आघाडीतील काही नेत्यांनी सुद्धा अनुभवला आहे. या पक्षामध्ये आम्ही आज काम करत नाही आहोत आमचे केस पांढरे झाले आणि आता परत काळे करतोय. फार-फार तर काय कराल तुरुंगात टाकलं ना.. तुरुंगात जायची तयारी आहे आमची. महाभारतातले योद्धे आम्हीच आहोत आणि माझं नाव संजय आहे. खरं तर आज योग दिवस आहे आणि मी विरोधकांना शवासनाचा सल्ला देईल.’
Pratap Sarnaik: शिवसेना आमदार प्रताप सरनाईकांचं ‘ते’ खळबळजनक पत्र जसंच्या तसं…
‘तीनही पक्षांची कमिटमेंट आहे हे सरकार पाच वर्षे चालवायचं’
दरम्यान, यावेळी संजय राऊत यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केलं आहे की, महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार हे पुढील पाच वर्ष चालेल. याबाबत बोलताना ते असं म्हणाले की, ‘महाविकास आघाडीतील तीनही पक्ष एका घट्ट नात्याने जोडलेले आहेत. प्रत्येक जण आपापल्या पक्षाचा विस्तार करतो. आम्ही सुद्धा करतो.’
‘कोणी कसं लढायचं याबाबत चर्चा आत्ताच झाली नाही. योग्य वेळी ती चर्चा करू. तीनही पक्षांची कमिटमेंट आहे हे सरकार पाच वर्षे चालवायचं. तीन पक्षाचा समन्वय हे एक आदर्श समन्वयाचा उदाहरण आहे.’ असं म्हणत त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं कौतुक केलं आहे.
ADVERTISEMENT