भाजप कोअर कमिटीची बैठक संपल्यानंतर आशिष शेलार यांनी ठाकरे सरकारविरोधात रणशिंग फुंकलं आहे. महाविकास आघाडीच्या दुष्कृत्यांचा, कारभाराचा आणि भ्रष्टाचाराचा एक पेर काढून आम्ही जनतेसमोर जाणार आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारच्या बदनामीचा कट काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना या तिन्ही पक्षांनी रचला आहे त्याचाही भांडाफोड आम्ही करणार आहोत असंही आशिष शेलार यांनी म्हटलं आहे.
ADVERTISEMENT
महाराष्ट्रातील जनतेला जी मदत सेवासुविधा आवश्यक आहेत त्या विकास करू शकत नाहीत. शेतकऱ्यांना काहीही मिळत नाही, विद्यार्थ्यांना मिळत नाही, बारा बलुतेदारांचा मिळत नाही, आमच्या दलित समाजाच्या बंधू-भगिनींना मिळत नाही, मराठा समाजाला मिळत नाही, म्हणून आम्ही महाराष्ट्रातील जनतेच्या हक्कासाठी आंदोलनाची रुपरेषाही आम्ही ठरवली आहे. येणाऱ्या काळात आम्ही सत्ताधारी आघाडीला सळो की पळो करुन सोडू असंही आशिष शेलार म्हणाले. भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेशाच्या कोअर कमिटीची बैठक आज भाजपच्या केंद्रीय नेत्यांच्या उपस्थितीत झाली त्यानंतर आशिष शेलार यांनी हे वक्तव्य केलं आहे.
केंद्रीय प्रभारी सि.टी रवी, पक्षाचे केंद्रीय संघटन मंत्री शुक्ला, सह प्रभारी पवय्या, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात बैठक झाली. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, गिरीश महाजन, संघनमंत्री श्रीकांत भारतीय, माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार, मुंबई अध्यक्ष मंगलप्रभात लोढा आणि सर्व सदस्य उपस्थित होते.
आघाडीतील एक पक्ष जिथे आहे तिथे दुसरा नाही. काही ठिकाणी त्यांची आपसातच मारामारी आहे. संपूर्ण महाराष्ट्रात संपूर्णपणे केवळ भारतीय जनता पक्षाच्या बुथ ते विधानसभेपर्यंतची रचना आम्ही पूर्ण करू शकलो. त्याचा लेखाजोखा या बैठकीत आम्ही घेतला असंही आशिष शेलार यांनी पत्रकारांनी सांगितला.
येणाऱ्या नोव्हेंबर ते मार्च दरम्यान या कालावधीत महाराष्ट्रात एका अर्थाने मिनी विधानसभेच्या निवडणुका होतील. जवळजवळ 274 नगरपालिका, महानगरपालिकांच्या निवडणुका, जिल्हा परिषदेच्या निवडणुका, खरेदी-विक्री संघाच्या, पंचायत समितीच्या निवडणुका होणार आहेत . त्यामुळे त्यांची पूर्ण रचना आम्ही केली असून, शत-प्रतिशत भाजपा हाच आमचा नारा आहे.
तिघाडीतील तिघांनी मिळून यावे, आपापसात पायात पाय घालून यावे, या निवडणुका जिंकण्यासाठीच्या तयारीला आम्ही लागलो आहोत. त्यासाठी आवश्यक व्यक्ती, परिवार, संघटना याबाबतच्या योजना आमच्या तयार आहेत. दिवाळीच्या नंतर एक चिंतन बैठक आमची होईल.
कारण आमच्या संपर्कात आजही काही लोक, परिवार, स्थानिक नेतृत्व आहेत. आजच त्याबाबत अधिक बोलता येणार नाही पण देवेंद्र फडणवीस यांनी पक्षाचे पदाधिकारी यांचे दौरे आणि प्रवास आता सुरू होतील. निवडणूका जिंकण्यासाठीचा आराखडा तयार झाला आहे.
येणाऱ्या काळामध्ये जानेवारी ते डिसेंबर या महिन्यांमध्ये जवळजवळ 15 विधानपरिषदेच्या निवडणुकांमधील सुद्धा आमच्या ताकदीच्या आधारावर अधिकचे यश मिळेल याचे राजकीय विश्लेषण सुध्दा आम्ही केले. दरम्यान, भाजपकडून एका परिवाराला टार्गेट जात आहे असा राष्ट्रवादीचे मंत्री नवाब मलीक यांनी केलेल्या आरोपाचे खंडन करुन चोर मचाए शोर, अशी प्रतिक्रिया भाजपा नेते आमदार अॅ़ड. आशिष शेलार यांनी दिली.
ADVERTISEMENT