ADVERTISEMENT
तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली.
शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्यांसह मंत्रिमंडळातील सहकारीही यावेळी उपस्थित होते. या बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत दोन्ही मुख्यमंत्र्यांनी भूमिका स्पष्ट केली.
या महत्त्वाच्या भेटीनंतर के. चंद्रशेखर राव यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची देखील भेट घेतली
शरद पवारांच्या मुंबईतील ‘सिल्व्हर ओक’ या निवासस्थानी जाऊन राव यांनी त्यांची भेट घेतील.
यावेळी राव यांनी संपूर्ण शिष्टमंडळासह पवारांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली.
या भेटीत कें चंद्रशेखर राव यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंप्रमाणेच शरद पवारांशी देखील देशातील राजकीय परिस्थितीवर चर्चा केली
शरद पवार यांनी देखील चंद्रशेखर राव यांच्यासमोर वेगवेगळ्या विषयांवर आपली मतं व्यक्त केली.
शरद पवार यांच्या कन्या आणि खासदार सुप्रिया सुळे या देखील आपल्या संपूर्ण कुटुंबासह सिल्व्हर ओकवरच हजर होत्या.
यावेळी स्वत: सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांचं स्वागत केलं. सुप्रिया सुळे यांच्यासोबत त्यांचे पती सदानंद सुळे आणि त्यांची मुलगी देखील यावेळी उपस्थित होते.
दरम्यान, या भेटीत चंद्रशेखर राव यांनी शाल देऊन पवारांचा आदर सत्कार केला.
याशिवाय के. चंद्रशेखर राव यांच्याकडून शरद पवार यांना काही मौल्यवान भेटवस्तू देखील देण्यात आल्या.
चंद्रशेखर राव यांनी उद्धव ठाकरे आणि शरद पवार या दोन्ही नेत्यांची एकाच वेळी भेट घेतल्याने आता राजकीय वर्तुळात याबाबत वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं आहे.
ADVERTISEMENT