अग्गंबाई सासूबाई या मालिकेने लीप घेतला आहे. त्यामुळे आता अग्गंबाई सासूबाई नाही तर अग्गंबाई सूनबाई ही कथा पहायला मिळणार आहे. या मालिकेची कथाही बदलण्यात आली आहे. नव्या कथेसह मालिकेचं शीर्षक देखील बदलण्यात आलंय. त्यामुळे आता अग्गंबाई सासूबाईऐवजी अग्गंबाई सूनबाई हे मालिकेचं शीर्षक आहे.
ADVERTISEMENT
मालिकेच्या कथेसह मालिकेच्या पात्रांमध्येही बदल झालेत. अग्गंबाई सूनबाई या मालिकेत अभिनेत्री तेजश्री प्रधान दिसणार नसून शुभ्राची भूमिका उमा पेंढरकर साकारणार आहे. तर सोहमची भूमिका कोण पार पाडणार यावरूनही पडदा उठला आहे. अग्गंबाई सूनबाई मालिकेत सोहमची भूमिका अद्वैत दादरकर साकारणार आहे.
दरम्यान अग्गंबाई सासूबाई या मालिकेत अभिनेता आशुतोष पत्कीने सोहमची भूमिका साकारली होती. सोहमने साकारलेली बबड्याची भूमिका घराघरात पोहोचली. त्यानंतर आता नव्या कथेत सोहमची भूमिका साकारणार आहे. लवकरच या मालिकेच्या शूटींगला सुरुवात होणार आहे.
तर अभिनेत्री उमा पेंढरकर शुभ्राच्या भूमिकेत दिसणार आहे. अभिनेत्री उमा पेंढरकरने यापूर्वी स्वामिनी मालिकेमध्ये पार्वतीबाईंची भूमिका साकारली होती. तर नवी शुभ्रा आणि सोहम प्रेक्षकांची मनं जिंकून घेणार का हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
ADVERTISEMENT