Air India Jobs: AIASL मध्ये बंपर भरती! चांगल्या पगारासह नोकरीची सुवर्णसंधी

रोहिणी ठोंबरे

04 Jul 2024 (अपडेटेड: 04 Jul 2024, 12:38 PM)

AIASL Recruitment 2024 : एअर इंडिया एअरपोर्ट सर्विसेस लिमिटेडमध्ये 3256 जागांवर विविध पदांसाठी बंपर भरती होत आहे. एकूण 19 पदांसाठी ही नोकरीची संधी आहे.      

Mumbaitak
follow google news

AIASL Recruitment 2024 : एअर इंडिया एअरपोर्ट सर्विसेस लिमिटेडमध्ये 3256 जागांवर विविध पदांसाठी बंपर भरती होत आहे. टर्मिनल मॅनेजर-पॅसेंजर, डेप्युटी टर्मिनल मॅनेजर-पॅसेंजर, ड्यूटी मॅनेजर-पॅसेंजर, ड्यूटी ऑफिसर-पॅसेंजर, ज्युनियर ऑफिसर-कस्टमर सर्विस, रॅम्प मॅनेजर, डेप्युटी रॅम्प मॅनेजर, ड्यूटी मॅनेजर-रॅम्प, ज्युनियर ऑफिसर-टेक्निकल, टर्मिनल मॅनेजर-कार्गो, डेप्युटी टर्मिनल मॅनेजर-कार्गो, ड्यूटी मॅनेजर-रॅम्प-कार्गो, ड्यूटी ऑफिसर-कार्गो, ज्युनियर ऑफिसर-कार्गो, पॅरा मेडिकल कम कस्टमर सर्विस एक्झिक्युटिव्ह, रॅम्प सर्विस एक्झिक्युटिव, यूटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हर, हँडीमन (पुरुष), यूटिलिटी एजंट (पुरुष) अशा एकूण 19 पदांसाठी ही नोकरीची संधी आहे. (Air India Recruitment 2024 in AIASL Golden job opportunity with good salary for engineers and graduated)               

हे वाचलं का?

पात्र आणि इच्छुक उमेदवारांची थेट मुलाखत 12 ते 16 जुलै 2024 दरम्यान होईल. मुलाखतीचे ठिकाण GSD कॉम्प्लेक्स, सहार पोलीस ठाण्याजवळ, सीएसएमआय एअरपोर्ट, टर्मिनल-2, गेट क्रमांक. 5 सहार, अंधेरी पूर्व आहे. नोकरीचे ठिकाणही मुंबई आहे. 

हेही वाचा : 'मी कोणताही पक्ष बदललेला नाही', अजित पवार अचानक असं का म्हणाले?

शैक्षणिक पात्रता

अर्ज करणारे उमेदवार, 

  • पद क्र.1: पदवीधर + 20 वर्षे अनुभव किंवा MBA+17 वर्षे अनुभव

  • पद क्र.2: पदवीधर + 18 वर्षे अनुभव किंवा MBA+15 वर्षे अनुभव
  • पद क्र.3:  1) पदवीधर 2) 16 वर्षे अनुभव
  • पद क्र.4:  1) पदवीधर 2) 12 वर्षे अनुभव
  • पद क्र.5: पदवीधर + 09 वर्षे अनुभव किंवा पदवीधर+MBA+06 वर्षे अनुभव
  • पद क्र.6: पदवीधर + 20 वर्षे अनुभव किंवा इंजिनिअरिंग पदवी (मेकॅनिकल/ ऑटेमोबाइल/ प्रोडक्शन/ इलेक्ट्रिलक अँड इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन) + 15 वर्षे अनुभव किंवा इंजिनिअरिंग डिप्लोमा (मेकॅनिकल/ इलेक्ट्रिलक/ प्रोडक्शन/ इलेक्ट्रॉनिक्स/ ऑटेमोबाइल)+20 वर्षे अनुभव किंवा MBA +17 वर्षे अनुभव
  • पद क्र.7: पदवीधर + 18 वर्षे अनुभव किंवा इंजिनिअरिंग पदवी (मेकॅनिकल/ ऑटेमोबाइल/ प्रोडक्शन/ इलेक्ट्रिलक अँड इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन) + 13 वर्षे अनुभव किंवा इंजिनिअरिंग डिप्लोमा (मेकॅनिकल/ इलेक्ट्रिलक/ प्रोडक्शन/ इलेक्ट्रॉनिक्स/ ऑटेमोबाइल) + 18 वर्षे अनुभव किंवा MBA + 15 वर्षे अनुभव
  • पद क्र.8: (i) पदवीधर किंवा इंजिनिअरिंग डिप्लोमा (मेकॅनिकल/ इलेक्ट्रिलक/ प्रोडक्शन/ इलेक्ट्रॉनिक्स/ ऑटेमोबाइल) 2) 16 वर्षे अनुभव
  • पद क्र.9: (i) इंजिनिअरिंग पदवी (मेकॅनिकल/ ऑटेमोबाइल/ प्रोडक्शन/ इलेक्ट्रिलक अँड इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन) 2) LMV.
  • पद क्र.10: पदवीधर + 20 वर्षे अनुभव किंवा MBA+17 वर्षे अनुभव
  • पद क्र.11: पदवीधर + 18 वर्षे अनुभव किंवा MBA+15 वर्षे अनुभव
  • पद क्र.12: (i) पदवीधर  (ii) 16 वर्षे अनुभव
  • पद क्र.13: (i) पदवीधर  (ii) 12 वर्षे अनुभव
  • पद क्र.14: पदवीधर + 09 वर्षे अनुभव किंवा पदवीधर+MBA+06 वर्षे अनुभव
  • पद क्र.15: पदवीधर+नर्सिंग डिप्लोमा किंवा B.Sc. (नर्सिंग)
  • पद क्र.16: (i) डिप्लोमा (मेकॅनिकल/ इलेक्ट्रिलक/ प्रोडक्शन/ इलेक्ट्रॉनिक्स/ ऑटेमोबाइल) किंवा आयटीआय/ NCTVT (मोटर व्हेइकल ऑटो इलेक्ट्रिकल/ एअर कंडिशनिंग/ डिझेल मेकॅनिक/ बेंच फिटर/ वेल्डर) 2) HMV ड्रायव्हिंग लायसन्स
  • पद क्र.17: (i) 10वी उत्तीर्ण   (ii) HMV ड्रायव्हिंग लायसन्स
  • पद क्र.18 आणि 19 : 10वी उत्तीर्ण

हेही वाचा : मुंबई Tak Impact: लाडकी बहीण योजनेसाठी महिलांकडून लाच, तलाठ्यावर कारवाई!

 

वयोमर्यादा

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय,

  • पद क्र.1, 2, 3, 6, 7, 8, 10, 11, & 12- 55 वर्षांपर्यंत
  • पद क्र.4 आणि 13- 50 वर्षांपर्यंत
  • पद क्र.5 आणि 14- 37 वर्षांपर्यंत
  • पद क्र.9 आणि 15 ते 19- 28 वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे.

शुल्क

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या जनरल/ ओबीसी कॅटेगरीतील उमेदवारांकडून 500 रूपये शुल्क आकारले जाणार तर, एससी/ एसटी/ इएक्सएसएम उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.

हेही वाचा : एका कुटुंबातील किती महिलांना मिळणार 1500 रुपये?, फडणवीसांची मोठी घोषणा

 

अधिक माहितीसाठी एअर इंडिया एअर सर्विसेस लिमिटेडच्या अधिकृत वेबसाइट https://www.aiasl.in/ वरून माहिती मिळवू शकता.

अधिकृत माहिती

https://drive.google.com/file/d/1ZDFuKK1MiosdmNm_Ul7nlQMaSUGYCc3q/view?usp=sharing
 

    follow whatsapp