उस्मानाबाद दौऱ्यावर असलेल्या अजित पवारांचं एक वेगळं रुप सर्वांना पहायला मिळालं. बीड आणि उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाचा प्रभाव अद्याप कमी होत नसल्यामुळे अजित पवार यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्यासोबत आढावा बैठक घेतली. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयात अजित पवार पोहचले असता त्यांना गार्ड ऑफ ऑनर देण्यासाठी पोलीस भर पावसात सज्ज होते. परंतू पावसाचा जोर पाहून अजित पवारांनी हा गार्ड ऑफ ऑनर नाकारत पोलिसांना पावसात भिजू नका असं सांगितलं.
ADVERTISEMENT
उस्मानाबादमध्ये सध्या जोरदार पाऊस सुरु आहे. अजित पवारांचा दौरा असल्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयाने गार्ड ऑफ ऑनरची तयारी केली होती. परंतू भर पावसाच पोलीस अधिकारी फक्त गार्ड ऑफ ऑनरसाठी भिजत उभे असल्याचं पाहून अजित दादांनी हा गार्ड ऑफ ऑनर नाकारला. नेहमी आपल्या रोखठोक शैलीमुळे चर्चेत असलेल्या अजित पवारांच्या या वेगळ्या रुपाची आज सर्वत्र चर्चा होताना दिसत आहे.
दरम्यान आज झालेल्या बैठकीत दोन्ही जिल्ह्यांतील स्थानिक लोकप्रतिनीधी हजर होते. कोरोना परिस्थिती नियंत्रणात आणण्यापासून खरीपाच्या पेरणीबद्दल अजित पवारांनी या बैठकीत चर्चा केली. कोरोना काळात जर कुठेही नियमबाह्र गोष्टी झाल्या असतील, कोणाला गरजेपेक्षा जास्त बील आकारली असतील तर ती परत करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना या बैठकीत देण्यात आल्याचं अजित पवारांनी सांगितलं. यावेळी नागरिकांनी नियम पाळले नाही तर तिसरी लाट जुलै महिन्यातच येईल असं म्हणत अजित पवारांनी सर्वांना नियमांचं पालन करण्याचं आवाहन केलंय.
ADVERTISEMENT