‘करेक्ट कार्यक्रम’ म्हटलं की, जयंत पाटलांचं नाव समोर येतं. पण, करेक्ट कार्यक्रम करण्यावरून भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन नेते समोरासमोर आलेत. एक आहेत विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार, तर दुसरे आहेत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे. अजित पवारांनी दिलेल्या आव्हानानंतर बावनकुळेंनी दंड थोपटले, त्यानंतर अजित पवारांनी बावनकुळेंची खिल्ली उडवली.
ADVERTISEMENT
काही महिन्यांपूर्वी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे बारामती दौऱ्यावर होते. या दौऱ्यात बावनकुळेंनी बारामतीत राष्ट्रवादी काँग्रेसचं घड्याळ बंद पाडणार. करेक्ट कार्यक्रम करणार असं विधान केलं होतं. त्यांच्या विधानावरुन अजित पवारांनी बावनकुळेंनी विधानसभेत बोलताना इशारा दिला होता. त्यानंतर बावनकुळेंनी करेक्ट कार्यक्रम करून दाखवा म्हणत पवारांना प्रतिआव्हान दिलं.
अमोल मिटकरींचं सत्तारांबद्दल ट्विट, अजित पवारांच्या भूमिकेवरच शंका?
बावनकुळेंनी आव्हाड दिल्यानंतर अजित पवारांनी मिश्कील भाषेत प्रत्युत्तर दिलंय. नागपूरमध्ये अजित पवारांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना ‘चंद्रशेखर बावनकुळे यांनी 2024 मध्ये पवारांचा करेक्ट कार्यक्रम करणार असं म्हटलंय’, असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर अजित पवार म्हणाले, “अरे बापरे… मला तेव्हापासून झोप येईना हो. हे ऐकल्यापासून आम्हा सगळ्यांची झोप हरपलीये. एवढ्या मोठ्या ताकदीचा नेता बावनकुळेंसारखा, अशा पद्धतीने आव्हान देतोय. मी तर विचार करतोय राजकारणच सोडून द्यावं. राजकारणातून संन्यास घ्यावा. असा अपमान 2024 ला होण्यापेक्षा संन्यास घेतलेला बरा”,
अरेच्चा! विरोधक विधिमंडळाच्या पायऱ्यांवर घेऊन आले ‘खोके’ अन् ‘बोके’
बावनकुळे काय म्हणाले होते?
अजित पवारांनी विधानसभेत केलेल्या टीकेनंतर बावनकुळे म्हणाले होते की, “अजित पवार यांच्यात फार हिंमत आहे असं वाटलं होतं, लढवय्ये आहेत असेही वाटलं होतं. पण माझ्या एका दौऱ्याने त्यांना इतका फरक पडला. अजित पवार यांना इतकी भीती वाटत आहे की ते माझा करेक्ट कार्यक्रम करायला निघाले आहेत, त्यांच्यात एवढी हिंमत नाही अजून की ते आमचा करेक्ट कार्यक्रम करू शकतील. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीत युती असूनसुद्धा राष्ट्रवादी कधी ७५च्या वर गेली नाही, ते काय करेक्ट कार्यक्रम करतील.”
ADVERTISEMENT