अकोला: 21 वर्षीय तरुणीचा झोका घेताना दोरीचा गळफास लागून मृत्यू

मुंबई तक

• 11:38 AM • 20 Dec 2021

अकोला: अकोला जिल्ह्यातील रिधोरा येथे एका 21 वर्षीय तरुणीचा घरात झोका घेत असताना दोरीचा गळफास लागून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कल्याणी पोटे असे या मृत तरुणीचे नाव असून ती डी.एडचे शिक्षण घेत होती. नेमकी घटना काय? स्थानिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कल्याणी घरातील पाळण्यावर बसून झोके घेत होती. पण अचानक पाळण्याच्या दोरीवरील उशी सरकल्याने […]

Mumbaitak
follow google news

अकोला: अकोला जिल्ह्यातील रिधोरा येथे एका 21 वर्षीय तरुणीचा घरात झोका घेत असताना दोरीचा गळफास लागून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कल्याणी पोटे असे या मृत तरुणीचे नाव असून ती डी.एडचे शिक्षण घेत होती.

हे वाचलं का?

नेमकी घटना काय?

स्थानिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कल्याणी घरातील पाळण्यावर बसून झोके घेत होती. पण अचानक पाळण्याच्या दोरीवरील उशी सरकल्याने ती खाली कोसळून बेडच्या काठावर पडली व दोरी तिच्या गळ्याभोवती अडकली. यावेळी दोरीचा फास प्रचंड वेगाने आवळला गेल्याने कल्याणीचा जगीच मृत्यू झाला.

काही वेळानंतर कल्याणीची आई तिच्या खोलीत आणि तिने हा सर्व प्रकार पाहताच तिने कल्याणीला उठविण्याचा अटोकाट प्रयत्न केला. पण कल्याणी कोणताही प्रतिसाद देत नव्हती. त्यामुळे तातडीने कल्याणीला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं.

रुग्णालय प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, शवविच्छेदन झाल्यानंतर कल्याणीचा मृतदेह तिच्या कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात येणार आहे. शवविच्छेदन अहवालातून तिच्या मृत्यूचं नेमकं कारण काय ते समोर येणार आहे.

भावाला म्हणाली, ‘वाल्मिकी त्रास देतोय’; भाऊबीजेच्या आधीच बहिणीनं घेतला गळफास

मात्र, या संपूर्ण घटनेनंतर कल्याणीच्या आई-वडिलांना आणि तिच्या संपूर्ण कुटुंबीयांना फार मोठा धक्का बसला आहे. 21 वर्षाच्या मुलीचा असा दुर्दैवीरित्या मृत्यू झाल्याने अकोल्यात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

आतापर्यंत झोपळ्याच्या दोरीचा फास लागून काही लहान मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. मात्र, 21 वर्षाच्या मुलीचा देखील अशाच प्रकारे मृत्यू झाल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. त्यामुळेच आपण आपल्या मुलांच्याबाबत अधिक सजग असणं गरजेचं आहे.

    follow whatsapp